इंदिरा गांधी यांना हत्या होणार हे माहीत होते; प्रियांका गांधीचा गौप्यस्फोट

 

ऑनलाईन डेस्क

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपली हत्या होणार आहे हे माहीत होते. त्यांच्या वागण्या बोलण्यातून तसे जाणवत होते. मात्र, त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्यासाठी देशच सर्वोच्च होता, असे विधान काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले. त्या उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे सभेत बोलत होत्या. या सभेत त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.

गांधी म्हणाल्या, ‘ इंदिरा गांधी यांना माहीत होते की त्यांची हत्या होणार होती. मी आणि माझा भाऊ शाळेत जाण्याआधी दररोज त्यांना भेटत असू. त्याप्रमाणे माझा भाऊ राहुल त्यांना भेटायला गेला. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ‘बेटा जर मला काही झालं तर रडायचं नाही.’

याचा अर्थ त्यांना माहिती होतं की त्यांची हत्या होऊ शकते. तरीही त्या कधीच मागे हटल्या नाही. त्यांच्यासाठी तुमच्या विश्वासापेक्षा जास्त या देशात, या जगात काहीच नव्हते. तुमचा विश्वास होता आणि त्यांच्या हृदयात आपल्या देशाबद्दल विश्वास होता. आज मी तुमच्यासमोर उभी आहे, ही त्यांचीच शिकवण आहे. मी तुमचा विश्वास कधीच तोडू शकत नाही.’

योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘ भाजप सरकारने दलित, मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्यासह ब्राह्मण वर्गांचे शोषण करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ हे गुरू गोरखनाथ यांच्या शिकवणीच्या विरुद्ध सरकार चालवत आहेत. हे सरकार दररोज लोकांवर हल्ले करत आहे.’

लखीमपूर खिरी हे तर उदाहरण

याचबरोबर ‘लखीपूर खीरी येथे ज्याप्रकारे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या व्यथा कुणीच नाही ऐकल्या, हे या सरकारची वास्तविकता दर्शवते. शेतकऱ्यांची व्यथा कोणीच ऐकायला तयार नाही.’

हेही वाचा : 

Source link

Leave a Reply