उद्धव ठाकरे बिळातील मुख्यमंत्री होते: ॲड.सदावर्ते
सोलापूर, दी.२६(प्रतिनिधी): महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती प्रश्नावर ॲड.सदावर्ते शहरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्या मागे थांबलेल्या एका तरुणाने पाठीवर शाई फेकून पळ काढला.
संवाद यात्रेनिमित्त ॲड. गुणरत्न सदावर्ते आज (शनिवारी) सोलापुरात आले होते.सध्या सुरू असलेल्या सीमाभागाच्या वादावर ॲड. जयश्री पाटील या उच्च न्यायालयात आपली बाजू मांडतील, यासंदर्भात ॲड. सदावर्ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी एक तरूण हॉटेलमध्ये आला आणि ‘जाहीर निषेध, जाहीर निषेध’ अशी घोषणाबाजी करू लागला. त्याचवेळी पत्रकार परिषदेत सदावर्ते यांच्या मागे उभा असलेल्या कार्यकर्त्याने ॲड. सदावर्ते यांच्या पाठीवर शाई फेकली.जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी त्यांनी केली.
याबाबत बोलताना ॲड. सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे वयोवृध्द पुढारी शरद पवार, संजय राऊत आणि बिळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख करून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या घटनेचा निषेध केला. त्यांच्या पिलावळांना आम्ही घाबरणार नाही असे म्हणत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार व मावळे असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा घटनांमुळे मला काहीच फरक पडणार नाही, माझा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, असेही ॲड. सदावर्ते म्हणाले.
खूपच चांगली भाषाशैली आणि बातमीची रचना..
Thanks 👍