पवन मोगरेकर : सरदार पटेलांनी केवळ 40 दिवसात भारतातील 562 संस्थानाचे विलीनीकरण करून घेतले. अनेक संस्थाने स्वतंत्र देश म्हणून राहू इच्छित होते.ब्रिटिशांनी त्यांना तशी परवानगीही दिली होती.
साम,दाम, दंड, भेद वापरून सरदार पटेलांनी संस्थाने विलीन करून घेतली. दिल्लीत सरदार पटेलांनी भव्य मंडप थाटला होता त्या मंडपात सरदार पटेल एका खुर्चीवर बसत. समोर टेबलावर विलीनीकरणाचे दस्तावेज एक एक राजा येत असे, व फॉर्म वर सही करून जात असे. जे संस्थान विलीनीकरणा साठी तयार नव्हते त्यांना सरदार पटेलांनी चांगलाच हिसका दाखवला. त्यांच्या विरुद्ध कडक पोलिस अँक्शन करून त्यांचे भारतात विलीनीकरण करून घेतले. खूप विनवणी करून भारतात येण्यास तयार नसलेल्या तसेच स्वतंत्र राहू इच्छिणाऱ्या एका राजाच्या कानावर सरदार पटेलांनी बंदूक रोखल्याचा प्रसंगही त्यांच्यावर आधारित विविध पुस्तकातून वाचायला मिळतो. केंद्रात विलीनीकरण मंत्रालयच स्थापन करण्यात आले होते. केवळ 40 दिवसात तब्बल 562 संस्थांनाचे विलीनीकरण करून घेतले.
या सर्व संस्थानात काश्मीर असे एकमेव संस्थान होते, ज्याच्या विलीनीकरणाचा अधिकार नेहरूंनी सरदार पटेलांकडे न देता नेहरूंनी स्वतः कडे घेतला. पुढे या काश्मीरचे काय झाले हा इतिहास सर्वांना माहीत आहे.
गझनी द्वारा 17 वेळेस पाडण्यात आलेल्या सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धारही नेहरूंचा विरोध असतानाही सरदार पटेलांनी धडाक्यात केला. परंतु मृत्यूनंतरही या पोलादी पुरुषाची काँग्रेसने नेहमी उपेक्षाच केली. नेहरूंनी स्वतःला भारत रत्न दिला. इंदिरा गांधी, यांनाही सरदार पटेलांच्या आधी भारत रत्न पुरस्कार देण्यात आला. परंतु सरदार पटेलांच्या मृत्यू नंतर 41 वर्षांनी देशातील लोकांच्या या बाबत होत असलेला असंतोष पाहून 1991 साली राजीव गांधी यांच्यासोबत या पोलादी पुरुषाला अखेर त्यांची उपेक्षा करूनच भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
सरदार पटेलांच्या पावन स्मृतीस अभिवादन.
Good🚩