[ad_1]
पुनित राजकुमार यांचे २९ ऑक्टोबरला हृदयाघाताने निधन झाले. पॉवरस्टार पुनीत राजकुमार यांचे चाहत्यांसाठी पार्थिव कंठीरवा स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. आज (दि.३१) रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या हजारो चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. वडील डॉ. राजकुमार यांच्या स्मारकाशेजारी पुनीत यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. मंत्री गोपालय्या यांनी याबाबतची पाहणी केली. शनिवारी सायंकाळी अंत्यविधी उरकण्यात येणार होता.
पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री बोम्मई यांची उपस्थिती
पण, अंत्यदर्शनासाठी येणार्या चाहत्यांची संख्या वाढत असल्याने रविवारी सकाळी अंत्यविधी होणार असल्याचे गोपालय्या यांनी सांगितले. मुख्यमंत्री बोम्मई यांनी पुनीत यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.
रविवारी सकाळपर्यंत अंत्यदर्शनाची परवानगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुनीत यांची मुलगी ध्रुती अमेरिकेहून दिल्लीला पोहोचली. तिथून ती बंगळूरला निघाल्याची माहिती मुख्यमंत्री बोम्मी यांनी दिली.
दोन चाहत्यांची आत्महत्या
कन्नड चित्रपट अभिनेता राजकुमार यांचा हृदयघाताने मृत्यू झाल्यानंतर ही बातमी कळतचा काही वेळानंतर बेळगाव जिल्ह्यात त्याच्या दोन चाहत्यांचाही मृत्यू झाला.
एका चाहत्याला हृदयविकाराचा धक्का बसला, तर दुसर्या चाहत्याने आत्महत्या केली.
शिंदोळीमधील कनकदास नगरचा रहिवाशी परशुराम हणमंत देमण्णावर (वय 33) याला पुनीतच्या मृत्यूची बातमी समजताच तीव्र धक्का बसला आहे. टीव्हीवर राजकुमार यांच्या मृत्यूचे वृत्त पाहत असताना त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
परशुराम हा कुली काम करत होता. शिवराजकुमार आणि पुनीत राजकुमार यांचा मोठा चाहता होता.
अथणी तालुक्यातील युवा चाहत्याने आत्महत्या केली. राहुल गाडीवड्डर (वय 26) असे त्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी पुनीत राजकुमारच्या फोटोची पूजा करून राहुने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांत झाली आहे.
लाडक्या अभिनेत्याच्या अचानक झालेल्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
[ad_2]