मार्च ठरला १२२ वर्षांतील सर्वात उष्ण महिना, देशातील बहुतांश भागांत उन्हाचा पारा चाळीशी पार

[ad_1]

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतात १९०१ नंतर प्रथमच मार्च २०२२ हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे, असे भारतीय हवामान विभागाच्या (IMD) डेटावरून आढळून आले आहे. देशापासून दूर राहिलेल्या पश्चिमी विक्षोभ तसेच राजस्थानमध्ये चक्रीवादळ विरोधी सर्कुलेशन तयार झाल्याने मार्च २०२२ सर्वाधिक उष्ण महिना ठरला. गेल्या महिन्यातच देशातील बहुतांश भागामध्ये उन्हाचा पारा चाळीशी पार झाला होता. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार मार्च महिना इतिहासातील सर्वात उष्ण महिना ठरला. यापूर्वी मार्च २०१० मध्ये सामान्य सरासरी तापमान (Temperature) ३३.०९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. मार्चच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात उष्णतेचे प्रमाण अधिक राहिले.

देशातील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

दिल्ली, चंद्रपार, जम्मू, धर्मशाला, पटियाला, डेहराडून, ग्वाल्हेर, कोटा, पुणे या भागांत उच्च तापमानाची नोंद झाली. पश्चिम हिमालयात असलेल्या ‘हिल स्टेशन’मध्ये सामान्यपेक्षा ७ ते ११ अंशानी जास्त गरमी नोंदवण्यात आली. डेहराडून, धर्मशाला आणि जम्मूमध्ये तापमान ३४ ते ३५ अंश नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे मार्च २०२२ मध्ये कमाल, किमान आणि सरासरी तापमान अनुक्रमे ३३.१ अंश सेल्सियस, २०.२४ अंश सेल्सियस आणि २६.६७ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. या तापमानाची १९८१-२०१० या वर्षाशी तुलना केली. तर ते ३१.२४ अंश सेल्सियस, १८.८७ अंश सेल्सियस आणि २५.०६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते.

पुढील ४-५ वर्षात भारतात १० लाख नोकऱ्यांची निर्मिती; शेफ आणि योग प्रशिक्षकांना मोठी संधी!

स्कायमेट नुसार पाकिस्तान तसेच थार वरुन वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे देशातील उष्णतेच वाढ झाली आहे. साधारणत: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम विक्षोभमुळे डोंगराळ भागात बर्फवृष्टी तसेच पाऊस पडतो. परंतु, यंदा हवामान शुष्क राहीले. उत्तर भारतात मार्च महिन्यात एक दिवसही पाऊस पडला नाही. हवामान खात्यानुसार ला-नीनामुळे उत्तर भारताला प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उत्तर भारतातील मैदानी भागांमध्ये अँटी सायक्लोनिक सर्कुलेशनचा प्रभाव असल्याने हवेतील आर्द्रता समाप्त होते. हे देखील भीषण गरमीचे कारण असू शकते, असा अंदाज हवामान खात्यातील वैज्ञानिकांनी वर्तवण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत १५ मार्चनंतर तापमानात सामान्यपेक्षा ५ ते १० अंश सेल्सियस अधिक नोंदवण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply