हल्ला प्रकरणी आमदार सोळंकेची चौकशी होणार का?

माजलगाव

रमेश आडसकर यांचे समर्थक असलेले अशोकराव शेजुळ यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाला असून आमदार प्रकाश सोळंके यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप अशोकराव शेजुळ यांनी केल्याने माजलगावच्या राजकीय वातावरणात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशोकराव शेजुळ हे शहरातील नामांकित व्यापारी असून ते भाजप नेते रमेशराव आडसकर यांचे समर्थक म्हणून परिचित आहेत आज त्यांच्यावर सकाळी 10.30 वाजता शाहू नगर भागात प्राणघातक हल्ला झाला असून पुढील उपचारार्थ त्यांना छत्रपती संभाजी नगर येथे दाखल केले आहे दरम्यान त्यांनी आमदार प्रकाश सोळंके यांचे नाव आल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तंग झाले आहे. आमदार प्रकाश सोळंके यांची पोलीस चौकशी होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आरोपी अद्यापी फरार आहेत.

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

Leave a Reply