१८ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात; भाजप विरूद्ध राष्ट्रवादी लढत 

सत्ता राखण्याचे आ. सोळंकेंपुढे आव्हान

माजलगाव, दि.२०: येथील उच्चतम कृषी बाजार समितीच्या निवडणुकीचे आज (गुरुवारी) अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसा अखेर एकूण १८ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उद्या (शुक्रवारी) चिन्ह वाटप होणार आहे.

 

आमदार प्रकाश सोळंके यांनी पहिल्यांदाच त्यांचा मुलगा वीरेंद्र सोळंके याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्याच्या सभापती पदाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून विद्यमान सभापती व उपसभापती यांचे तिकीट कापण्यात आले आहे.या निवडणुकीत आमदार प्रकाश सोळंके यांच्या समोर बाजार समितीवर वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान आहे. तर प्रतिस्पर्धी भाजपने आ.सोळंके यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दोन्ही गटाकडून आप आपले पॅनलचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांचे समर्थक असणारे विद्यमान संचालक प्रभाकर गणपतराव होके पाटील, जुगलकिशोर मिठूलाल नांवदर हे व्यापारी मतदार संघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेस – पॅनल

सोसायटी मतदार संघ – सर्वसाधारण

 

१. अशोक गोविंदराव डक

२. जयदत्त नरवाडे

३. संजय कचरे

४. नाईकनवरे उद्धव

५. डाके दत्ता

६. चाळक श्रीकृष्ण

७. वीरेंद्र सोळंके

 

सोसायटी मतदार संघ – महिला

 

१. सरस्वती घायतिडक

२. अंजली भोसले

 

सोसायटी मतदार संघ – भटक्या विमुक्त जाती जमाती

 

१. सजगणे नंदकिशोर

 

सोसायटी मतदार संघ – इतर मागासवर्ग

 

१. जाधव आरूण

 

ग्राम पंचायत मतदार संघ – सर्वसाधारण

 

१. कदम सतिष

२. शेजुळ भागवतराव

 

ग्रामपंचायत मतदार संघ – अनु.जाती जमाती

 

१. मौरे श्रीहरी

 

ग्राम पंचायत मतदार संघ – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक

 

१. चव्हाण मेघा

 

व्यापारी मतदार संघ

 

१. सुशांत रांजवण

२. बंडु इंके

 

हमाल व मापाडी मतदार संघ

 

१. वसंत सावंत

 

****************

 

भाजप – पॅनल

सोसायटी मतदार संघ – सर्वसाधारण

 

१. बादाडे जगदिश सोपानराव

२. काळे नितीन मदनराव

३. कचरे भास्कर ज्ञानोबा

४. यादव संतोष मदनराव

५. जगताप मनोज बाळाभाऊ

६. चव्हाण राजेभाऊ बळीराम –

७. झोडगे पांडूरंग सिताराम

 

सोसायटी मतदार संघ – महिला

 

१. चाळक अर्चना रामेश्वर

२. कदम अंजली कमलाकर

 

सोसायटी मतदार संघ – इतर मागासवर्ग

 

१. खेत्री प्रभाकर विश्वनाथ

 

सोसायटी मतदार संघ – भटक्या विमुक्त जाती जमाती

 

१. सरगर लक्ष्मण गोविंदराव

 

ग्राम पंचायत मतदार संघ – सर्वसाधारण

 

१. नाईकनवरे नितीन किशनराव

२. सोळंके श्रीकृष्ण बापुराव

 

ग्राम पंचायत मतदार संघ – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक

 

१. आगे भगवान लक्ष्मण

 

ग्रामपंचायत मतदार संघ – अनु.जाती जमाती

 

१. खळगे श्रीराम विठ्ठलराव

 

व्यापारी मतदार संघ

 

१. चांडक रामकिशन श्रीकिसन

२. जाधव गणेश रामराव

 

हमाल व मापाडी मतदार संघ

 

१. मस्के ज्ञानोबा लक्ष्मणराव

अशा प्रकारे दोन्हीं पॅनल कडून आपापले उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत.चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल.

Leave a Reply