“प्रेम नव्हतं, झहीर शेखने लहानपणीच धमकी देत बलात्कार केला!” भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळं वळण; पोस्को गुन्हा दाखल.

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ज्या तरुणीच्या अपहरणाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता, त्या घटनेला 47 दिवसांनंतर आता एक खळबळजनक वळण मिळाले आहे. लग्नाच्या अवघ्या पाच दिवस आधी भरबाजारात आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पळवून नेलेल्या त्या तरुणीने आता पोलिसांसमोर येत झहीर शेख आणि त्याच्या साथीदारांच्या क्रूरतेचा पाढा वाचला आहे.
नेमकी घटना काय होती?

ही घटना 17 फेब्रुवारी 2026 रोजी घडली. 22 फेब्रुवारीला पीडितेचे लग्न ठरले होते. विवाहाची तयारी आणि दागिने खरेदी करण्यासाठी ती आई आणि भावासोबत बाहेर पडली होती. याच संधीचा फायदा घेत झहीर शेख, त्याचा भाऊ आयान आणि अझर शेख यांनी भररस्त्यात फिल्मी स्टाईलने या तरुणीला ओढत टेम्पोत बसवले. आईने विरोध केला असता त्यांना बेदम मारहाण करून, डोळ्यात मिरचीपूड टाकून या टोळीने मुलीचे अपहरण केले.

अत्याचार, धमकी आणि जबरदस्तीचा खेळ

पीडितेने 4 एप्रिल रोजी बारामती पोलिसांना दिलेल्या जबाबातून या प्रकरणातील भयानक वास्तव समोर आले आहे. मुख्य आरोपी झहीर शेख याने ती अल्पवयीन असतानाच बारामतीमधील एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. दोघांचे अश्लील फोटो तरुणीच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन तो वारंवार तरुणीवर अत्याचार करत होता.

दरम्यान, घटनेच्या दिवशी अपहरण केल्यानंतर तिला खंडाळा मार्गे बारामतीला नेण्यात आले. तिथे तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन, जबरदस्तीने ‘आम्ही लग्न केले असून मी स्वतःच्या मर्जीने आली आहे’ असा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर कोऱ्या स्टॅम्प पेपरवर तिच्या सह्याही घेतल्या गेल्या.

सुरुवातीला दहशतीखाली असलेल्या या मुलीने 19 फेब्रुवारीला पोलिसांत आरोपींच्या दबावाखाली जबाब दिला होता. मात्र, सुधारगृहातून बाहेर आल्यानंतर आणि स्वतःच्या सुरक्षित वातावरणात पोहचल्यानंतर तिने हा सर्व घटनाक्रम घरच्यांना सांगितला. या तक्रारीनंतर आता भिगवण पोलिसांनी झहीर शेख, आयान शेख, अझर शेख आणि सद्दाम शेख या चौघांविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि अपहरणासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply