मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवणे झाले सोपे; ‘या’ ॲप वरून करा अर्ज

 

मुंबई: आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत मिळविता येणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. देवेंद्र फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे तत्कालीन प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी राज्यातील लाखो रुग्णांना कोट्यावधी रुपयांची मदत करून या कक्षाचे नाव घराघरापर्यंत पोहोचवले. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोरोना सारखी महामारी येऊनही सदर कक्ष बंदच राहिला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सत्तेत येताच पुन्हा एकदा मदत कक्ष सुरू करण्यात आला.

 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते.

Leave a Reply