पंचामृत अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी १ हजार कोटींची भरीव तरतुद – डाॅ. विकास महात्मे 

समाजाच्या उत्थानासाठी मोलाचे ठरणार १० हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज योजना

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा पंचामृत अर्थसंकल्प सादर करताना धनगर समाजासाठी महत्वाची घोषणा केल्यात. पंचामृत अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी 1 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतुद केल्याचे प्रतिक्रीया माजी खासदार डाॅ.विकास महात्मे यांनी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले. पुढे बोलतांना डाॅ. विकास महात्मे म्हणाले की, उपमुख्यमंत्रयांनी महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना. अहमदनगर येथे या महामंडळाचे मुख्यालय असणार आहे.तसेच शेळी-मेंढी पालनासाठी 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज योजना ही धनगर समाजाच्या उत्थानासाठी मोलाचे ठरणार,असेही डाॅ. विकास महात्मे म्हणाले.

सद्यस्थितीतील एकूण २२ योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी केल्याचेही उपमुख्यमंत्रयांनी सांगतिले आहे. महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापनेची घोषणा ही महत्वाची आहे. तसेच राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेत मेंढी पालनासाठी भरीव निधी हा समाजभिमुख कार्याला प्रगती पथावर नेणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या पंचामृत सूत्रानुसार सर्वसामान्यांचा विकास व महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे.अमृत काळाचं हे प्रथम वर्ष आहे.अर्थ संकल्पात शेतकरी , महिला, तरुण, नोकरदार, उद्योगपती, व्यावसायिक, या सर्वच बाबींचा सर्वंकश विचार करण्यात आला असून धनगर समाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत आहे, अशी प्रतिक्रीया डाॅ. विकास महात्मे यांनी दिली.

Leave a Reply