रमेश आडसकर यांच्या प्रयत्नाला यश
माजलगाव (प्रतिनिधी): माजलगाव मतदासंघाचे नेते रमेश आडसकर यांनी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या प्रयत्नाला यश आले असून मुख्यमंत्री ग्रामसडक ( जिल्हा वार्षिक व आशियाइ विकास बँक ADB) अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या माजलगाव मतदासंघांतील माजलगाव, धारूर व वडवणी तालुक्यातील विविध रस्त्याच्या कामासाठी एकूण 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये माजलगाव तालुक्यातील 23.26 किमी लांबीच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली असून 18.76 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.यात पुढील रस्ते समविष्ट आहेत:
1) रामा 61 ते बाराभाई तांडा 2.77 कोटी (लांबी 4.20 किमी),
2) रामा 61 ते ग्राम 29 ते जदीद जवळा तें फुल पिंपळगाव -3.34 कोटी (लांबी 4.79 किमी),
3) इजीमा 65 ते खुळखुळी तांडा -10.1 कोटी (लांबी 1.30 किमी),
4) इजीमा 124 ते साळेगाव कोथरूळ प्रजीमा 48 -5.73 कोटी (लांबी 6.30 किमी),
5) नाकलगाव पिंपळगाव ते दिंद्रुड -5.92 कोटी (6.76 किमी) माजलगाव तालुका हद्दीतील या 5 रस्त्यांच्या दर्जोन्नती कामांना मंजुरी मिळाली आहे.
वडवणी तालुक्यातील 11.71 किमी लांबीच्या रस्ते कामांसाठी 6.67 कोटी रुपये मंजूर झाले असुन यात पुढील रस्ते समाविष्ट आहेत:
1) रामा 55 ते मिमनाईक तांडा ते खलवट निमगाव- 86 लाख (लांबी 1.50 किमी)
2) रामा 361 ते बावी तांडा -1.90 कोटी (2 किमी लांबी)
3)इजीमा 121 ते डोंगरेवाडी- 97 लाख (लांबी 1.30 किमी)
4) इजीमा 122 ते तीगाव रस्ता -80लाख (लांबी 1 किमी)
5)रामा 361 ते पुसरा तीगाव रस्ता -3.11 कोटी (लांबी 5.9 किमी)
वडवणी तालुका हद्दीतील या 5 रस्त्यांच्या दर्जोन्नती कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
सदर योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या धारूर तालुक्यातील 14.8 किमी लांबीच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली असून यासाठी 12 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात पुढील रस्ते समाविष्ट आहेत:
1) इजीमा 66 ते निमला रस्ता (1.9 किमी लांबी)
2) गांजपूर ते तांबवा रस्ता -3.51कोटी (4 किमी लांबी)
3) ग्राम 232 ते हसनाबाद -1.72 कोटी ( 2 किमी लांबी)
4) रामा 46 ते मेहानानाईकतांडा- 92लाख ( लांबी 1.2 किमी)
5) प्रजीमा 59 ते कवटी तांडा -69लाख (लांबी 1 किमी)
6) प्रजीमा 59 ते कदरी तांडा -67 लाख (लांबी 1 किमी)
7) रामा 248 सी ते सोनी मोहा तोंडेवस्ती – 2.83 कोटी (3.6 किमी) या 7 रस्त्यांच्या दर्जोन्नती कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या धारूर तालुक्यात 14.8 किमी लांबीच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली असून 12 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात पुढील रस्ते समाविष्ट आहेत:
1) इजीमा 66 ते निमला रस्ता (1.9 किमी लांबी)
2) गांजपूर ते तांबवा रस्ता -3.51 कोटी (4 किमी लांबी)
3)ग्राम 232 ते हसनाबाद -1.72 कोटी ( 2 किमी लांबी)
4) रामा 46 ते मेहानानाईकतांडा- 92 लाख (लांबी 1.2 किमी)
5) प्रजीमा 59 ते कवटी तांडा -69 लाख (लांबी 1 किमी)
6) प्रजीमा 59 ते कदरी तांडा -67 लाख (लांबी 1 किमी)
7) रामा 248 सी ते सोनी मोहा तोंडेवस्ती – 2.83 कोटी (3.6 किमी) तालुका हद्दीतील या 7 रस्त्यांच्या दर्जोन्नती कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे.
माजलगाव मतदासंघातील विवीध रस्त्यांच्या कामासाठी भरघोस निधीची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पंकजाताई गोपीनाथ मुंडे,खासदार प्रीतमताई मुंडे,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री अतुल सावे यांचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते रमेशराव आडसकर,तालुकाध्यक्ष अरुण राऊत, जिल्हा सचिव बबन सोळंके, वडवणी तालुका अध्यक्ष पोपट शेंडगे,धारूर तालुकाध्यक्ष एड.चोले यांनी आभार व्यक्त केले आहेत.