Gold Silver Price Today : दिवाळीत स्वस्त झाले सोने, खरेदीसाठी सुवर्णसंधी!

[ad_1]

ऑनलाईन डेस्क

आज आठवड्याच्या पहिली दिवशी म्हणजे सोमवारी (दि. १ नोव्हेंबर) सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाली. त्यामुळे दिवाळीत सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. सराफा बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४८ हजारांच्या खाली आलाय. सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव १९९ रुपयांनी स्वस्त होत ४७,७७६ रुपये (प्रति १० ग्रॅम) झाला. तर चांदीचा प्रति किलो भाव ६४,३६८ रुपये होता. दिवाळी सणाची सुरुवात आज सोमवारी (१ नोव्हेंबर) वसुबारसने झाली. मंगळवारी (दि.२) धनत्रयोदशी व धन्वंतरी जयंती, बुधवारी अमावास्या, गुरुवारी (दि. ४) नरकचतुर्दशी व लक्ष्मी-कुबेर पूजन होणार आहे. त्याआधी आज सोने काही प्रमाणात स्वस्त झाले.

Gold Prices Today

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Silver Price Today सोमवारी १ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४७,७७६ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,५८५ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,७६३ रुपये, १८ कॅरेट ३५,८३२ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,९४९ रुपये होता. (हे सोमवारी दि. १ नोव्हेंबर दुपारपर्यंतचे अपडेटेड दर असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो). सणासुदीला विशेषतः दिवाळीत सोने खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. या दिवसांत सोन्याला मागणी अधिक असते.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कळंबा कारागृहात बंदीजनांनी भरवला दिवाळी मेळा | Kalamba Central Jail Kolhapur | कळंबा कारागृह

[ad_2]

Source link

Leave a Reply