माजलगाव
शहरातील हनुमान मंदिर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे पूजन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष माजलगाव च्या वतीने शहरातील हनुमान मंदिरात राज्यघटनेचे पूजन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला होता याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय दादा साळवे, भाजप नेते ज्ञानेश्वर मेंडके, संपादक शिवाजीभाऊ रांजवण माजी नगराध्यक्ष अशोक तिडके,शरद कचरे मंडळ अध्यक्ष विनायक रत्नपारखी यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पवन मोगरेकर यांनी भारतीय राज्यघटने बाबत थोडक्यात माहिती दिली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय दादा साळवे यांनी भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित केले भारतीय जनता पक्ष घटना बदलणार आहे असा फेक मराठी विरोधक पसरवत आहेत परंतु भारतीय जनता पक्षाने घटनेचा नेहमी सन्मान केला आहे.भारत राष्ट्र सुदृढ व बलशाली होण्यासाठी समाजात एकोपा असणे आवश्यक असून जातीपातीतला विद्वेष कमी होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले यावेळी प्रमुख उपस्थितांसह ईश्वर खुर्पे विनोद लड्डा, अभय होके,बाळासाहेब क्षीरसागर, राम शिंदे, उमेश जाधव, रवी गायकवाड यांच्यासह बहुसंख्य भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार शहराध्यक्ष विनायक रत्नपारखी यांनी मानले.