पवन मोगरेकर
पॅलेस्टाइनमध्ये उदयास आलेली हिब्रू किंवा ज्यू लोकांची संस्कृती. यहुदी या नावाने हे लोक ओळखले जातात. इ. स. पू. आठव्या शतकात बेंजामिन व ज्यूडा या दोन जमातींनी ज्यूडाचे राज्य स्थापन केले. त्यांतील नागरिकांना ज्यूडियन म्हणत. त्यावरूनच पुढे ज्यू ही संज्ञा निर्माण झाली असावी. इ. स. १३२ मध्ये रोमन सम्राट हेड्रिएनस याने ज्यू धर्मावर बंदी घातली. तेव्हापासून जवळजवळ अठराशे वर्षांपर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरपर्यंत ज्यू समाजाला स्वतःची अशी मातृभूमी नव्हती.
जगातील काही अत्यंत प्राचीन संस्कृतींचा वारसा ज्यू लोकांकडे आला. तसेच ख्रिस्ती व इस्लाम या दोन महत्त्वाच्या धर्मांची वैचारिक व तात्त्विक बैठक उभारण्यास ज्यू संस्कृती साहाय्यभूत ठरली. एकीकडे अत्यंत प्राचीन व दुसरीकडे अगदी अर्वाचीन अशा संस्कृतींशी दृढ संबंध असणाऱ्या या समाजाला जगाच्या राजकीय नकाशात प्रदीर्घ काळ स्थानच नसावे, हा इतिहासाचा एक चमत्कार म्हणावा लागेल पण याहीपेक्षा मोठा चमत्कार असा की, पोटासाठी जगभर विखुरलेल्या या समाजाने मातृभूमी नसतानासुद्धा पुन्हा आपली मातृभूमी आपण मिळवू ही एकात्मतेची जाणीव सतत एक हजार वर्षे कायम ठेवली, हा होय.
स्वतःच्या मायभूमितुन प्रताडीत होऊन ज्यु बांधव जगभर विखुरले आश्रित होऊन गेलेल्या अनेक देशांनी ज्यूंना पुन्हा पुन्हा प्रताडीत केले अगदी हिटलर सारख्या हुकूमशाहने लाखो ज्यूंना गॅस चेंबर मधे फेकून दिले.जर्मनीच्या अनेक भागात ज्यूंना वेदनादायी मृत्यू देण्यासाठी शेकडो गॅस चेंबर उभारले होते.जेंव्हा दोन ज्यु लोक भेटत तेंव्हा ते एकमेकांना हजार वर्षापूर्वी मातृभूमी सोडताना घेतलेल्या शपथेची आठवण करून देत.शपथ तरी कोणती होती?
ती शपथ होती आज आम्हाला आमची मातृभूमी सोडावी लागतं असली तरी पुन्हा आमची मातृभूमी आम्ही मिळवूच.
तब्बल एक हजार वर्षांनी सन 1948 साली ज्यु लोकांनी स्वतंत्र इस्राईल देश स्थापन करून ती शपथ पूर्ण केली.
इस्राईलच्या चारी बाजूला कडवट इस्लामी अरब राष्ट्रे आहेत इस्राईलला संपवून टाकण्यासाठी ही इस्लामी राष्ट्रे अनेक वेळेला एकत्र आली इस्राईलवरती चारी बाजूनी हल्ले केले तरीही इस्राईल या इस्लामी राष्ट्रांना तोंड देत राहिला.
हिंदू आणि ज्यु लोकांच्या इतिहासातील समान दुवा म्हणजे स्वतःच्याचं मायभूमीत दोन्ही समाज प्रताडीत करण्यात येऊनही हे दोन्ही समाज पुन्हा पुन्हा उभे राहिले हे विशेष.
हिंदूंच्या धर्मांतरातून भारताला इस्लामी देश करण्याचा मनसुबा कासीम पासून औरंगजेबा पर्यंत प्रत्येकाने पहिला यासाठी प्रचंड धर्मांतरे, धर्मांतर न करणाऱ्यांच्या सामूहिक कत्तली,हिंदूंच्या मुंडक्यांची मिनारे उभारली गेली.हिंदूंचा स्वाभिमान पायदळी तुडवला जावा म्हणून काशी विश्वनाथ पासून,सोरटी सोमनाथाच्या पवित्र शिव लिंगाच्याही ठिकऱ्या ठिकऱ्या उडवण्यात आल्या.सोमनाथाचे मंदिर तर सतरा वेळेस पाडण्यात आले प्रत्येक वेळी पाडलेली ही मंदिरे हिंदूनी पुन्हा पुन्हा उभारली.
जेरुशेलम येथील ज्यूंच्या टेम्पल माउंट पासून(सध्याची अल-अक्सा मशीद) अयोध्या व ज्ञानवापी मंदिरा पर्यंत समान दुवा म्हणजे या भक्ती केंद्रावर ताबा करून त्यांची मूळ ओळख पुसण्यात आली.
जो पर्यंत सांस्कृतिक युद्ध आणी राजकीय लढा ओळखला जात नाही तो पर्यंत या लढाया होतंच जाणार कारण या सर्व युद्धाच्या तळाशी एक विचार आहे भले तो इस्राईल असो, फ्रान्स असो,किंवा भारत असो मूळ सांस्कृतिक कट्टर विचार ओळखणे गरजेचे आहे.
काल हमासने इस्राईल वरती आक्रमण करून जवळपास 300 ज्यू नागरिकांना ठार मारले.प्रत्युत्तरात इस्राईलनेही हल्ला केला असून ही लढाई लवकर संपणार नसल्याचे मनसुबे दाखवले आहेत. मुळात अश्या लढाया कधीच संपत नसतात कारण या लढाईच्या मुळाशी सांस्कृतीक कट्टरता आहे ती गेल्या हजार वर्षापासूनची आहे. आम्ही सोडता इतरांना जगण्याचा अधिकारच नाही,आम्हीच श्रेष्ठ या विचारावर हे सांस्कृतीक युद्ध असल्याने ते संपणारे नव्हे. भविष्यात या सर्वांची सर्वात जास्त धग कुणाला बसणार तर अर्थात भारताला.दक्ष राहण्याची गरज
पवन मोगरेकर
क्रमशः