API शिवाजी नागवेला निलंबित करण्यासाठी धनगर समाजाची आज पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक
जालना (प्रतिनिधी): मारहाण झाल्याची फिर्याद देण्यास गेलेल्या फिर्यादींना पोलिस कोठडीत डांबून अमानुषपणे मारहाण करीत फिर्यादी व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना जातीवादी शिवीगाळ करणाऱ्या आष्टी पोलीस स्टेशनच्या एपीआय शिवाजी नागवेला निलंबित करण्यासाठी आज सकाळी ११ वा. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धनगर समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
जालना जिल्ह्यातील कोकाटे हादगाव ता.परतुर येथे शेतीच्या वादातून धनगर समाजाच्या लोकांच्या घरांवर प्रस्तापित मस्तवल, समाजाकडून सामुदायिक हल्ला करण्यात आला यात अनेक लोक जखमी झाले.याची तक्रार देण्यासाठी आष्टी पोलिस चौकीला गेले असता फिर्यादीवरच खोटे गुन्हा दाखल करुन लाँक अप मध्ये कोंडून API शिवाजी नागवे यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे.या मारहाणीची काँल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असुन त्यात पोलीस अमानुष पणे मारहाण करतांना ऐकू येत आहेत तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचेबद्दल पोलीस अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होते.सदरील घटना 28 /11/2022 रोजी आष्टी पोलिस चौकी येथे घडलेली आहे.यावेळी बीट जमादार बहिरवार यानेही कोकाटे हादगाव येथील 7 नागरिकांना मारहाण केली.फिर्याद देण्यासाठी गेलेल्या लोकांवर भांदवी 324,323,504,148 प्रमाणे खोटे गुन्हे दाखल करुन न्यायालयासमोर हजर न करताच दोन दिवस पोलीस स्टेशनला डांबून ठेवून मारहाण केली.आष्टी पोलिसांकडुन अधिकाराचा दुरुपयोग करण्यात आला असुन अंगावर असलेल्या खाकीचा जातीसाठी वापर करणाऱ्या व जातीयवादी भूमिका घेवून गोरगरिबांना मारणा-या नागवेचा विवीध स्तरावर जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे.