बीड प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे खाटकांनी केलेल्या हल्ल्यात गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या झाली.महाराष्ट्र गोवंश कत्तल विरोधी कायदा असूनही रोज कुठेना कुठेतरी गोवंशाची
तसेच त्यांच्या मौंसाच्या तस्करीच्या घटना उघडकीस येत आहेत. काही महिन्यांपासून अशा घटनेत वाढ झाली असून गोवंश कत्तल विरोधी कायदा असूनही या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गोवंश तस्कर निर्ढावल्याचे दिसत आहे.
लाल बीड जिल्ह्यातील खडकत ता. आष्टी येथील कत्तलखाण्यात पोलिसांनी धाड टाकली.अचानक पडलेल्या धाडीमुळे उपस्थित वीस कसाई पळून गेले परंतु तेथील चित्र खूप भीषण होते गोवंशाचे मुंडके,हात पाय तसेच सर्वत्र रक्ताचा मांसाचा सडा पडला होता पोलिसांनी पशुधन अधिकारी संदीप गायकवाड यांना पाचारण केले असता 172 गोवंशाची कत्तल झाल्याचे पशुधन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.खडकत येथील अतिक मुनिर कुरेशी यांच्या विरुद्ध भा. द. वी. 428,201,सह 5,9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 अनुसार गुन्हा दाखल झाला आहे.