छत्रपती शिवराय केसरीच्या पहिल्या किताबाचा मानकरी ठरला पैलवान सुमित कुमार भारस्कर

छत्रपती शिवराय केसरीच्या पहिल्या किताबाचा मानकरी ठरला पैलवान सुमित कुमार भारस्कर

 

माजलगाव ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या पुनर्वसन भागातील शेलापुरी येथील पै. सुमितकुमार आपासाहेब भारस्कर याने अहमदनगर येथे सुरु असलेल्या छत्रपति शिवराय केसरी २०२३ या कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजन गटात पहिल्यांदा सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेच्या किताबाचा मानकरी ठरला .

गेल्या दोन तीन दिवसांपासून नगर जिल्ह्यात क्रीडासंकुल येथे छत्रपती शिवराय केसरी २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. पै.सुमितकुमार आप्पासाहेब भारस्कर याने ६५ किलो वजन गटातुन राज्यातील अनेक नामवंत मल्लांना आसमान दाखवत झालेल्या स्पर्धेत 5 मल्लांना चितपट करत सेमी फाइनल फ़ेरीत कोल्हापूर येथील आर्मीतील कुस्तीपटू पै. रोहन याच्यासोबत अटीतटीच्या लढ़तीत ११-७ नी विजयश्री खेचून अंतिम सामन्यात भारतीय रेल्वेतील कुस्तीपटू पै. विक्रम कुऱ्हाडे याच्यासोबत १०-६ असा जोरदार आणि अतिशय चुरशिच्या लढतीत मोठ्या फरकाच्या गुणाधिक्याने विजय मिळवुन छत्रपति शिवराय केसरी किताबाचा या मानाच्या किताबाचा एक लक्ष रूपये ईनामाचा मानकरी पै. सुमितकुमार आप्पासाहेब भारस्कर ठरला आहे .

खेलो इंडिया युथ गेम सुवर्णपदक कामगिरीच्या येशा नंतर या अभूतपूर्व येशाचे राज्यभरासह जिल्ह्यातील भूमिपुत्र म्हणून सर्वत्र पैलवान सुमित कुमार भारस्कर यांचे कौतुक होत आहे . पैलवान सुमितकुमार भारस्कर हा सद्या पुणे येथील रुस्तुम ए हिंद पै.अमोल बचुडे यांच्या कुस्ती केंद्रात कुस्तीचे प्रशिक्षण घेत असून ,त्याने या अभूतपूर्व येशाचे श्रेय आपल्या आई वडिलांसह प्रशिक्षकांना दिले आहे.

Leave a Reply