खा.विखे साहेब…अहमदशहा तुमचा नातेवाईक होता काय?


दत्ता वाकसे यांचा खा.सुजय विखेंना खोचक सवाल

बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या वतीने काही दिवसापूर्वीच अधिवेशनामध्ये सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते की अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यासाठी स्थानिक पातळीवर महानगरपालिकेच्या वतीने बहुमत सिद्ध करून ठराव देण्यात येईल व त्यानंतर आम्ही निर्णय घेऊन असे अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुचित केले होते परंतु अहमदनगरचे खासदार सुजित विखे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की नामांतराचा विषय हा आमच्या स्थानिकच्या लोकांचा विषय आहे त्याला आमचा विरोध आहे परंतु आता मात्र राज्यातील धनगर समाज अक्षरशा खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधामध्ये पेटून उठला आहे अहिल्यानगर नावाला विरोध करणाऱ्या सुजय विखे यांना शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी अहमदशहा तुमचा नातेवाईक होता काय? असा खोचक सवाल खा.सुजय विखे यांना केला आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यास जगात तोड नाही. देशात कानाकोपऱ्यात मंदिर,घाट,पान पोया, अन्न छत्रे उभारली. हिंदूंची अस्मिता जागृत ठेवली. अशा उत्तुंग उंचीच्या व्यक्तिमत्वाचे नाव आपल्या जिल्ह्याला मिळत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. पण संकुचित मनोवृत्ती बाळगणाऱ्या खा. सुजय विखे यांनी विरोध करून आपले संस्कार दाखवून दिले आहे. आगामी काळात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील धनगर समाज हा खासदार सुजय विखे यांना जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही लोकसभा मतदार संघामध्ये लोकसभेच्या वेळेस संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून खासदार सुजय विखे यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही धनगर समाजाचे मावळे शांत बसणार नाहीत जोपर्यंत पत्रकार परिषद घेऊन धनगर समाजाच्या दुखावलेल्या भावना आणि झालेले चूक मान्य करणार नाहीत तोपर्यंत राज्यातील दोन कोटी धनगर समाज शांत बसणार नाही खासदार सुजय विखे पाटील यांना ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वारस धनगर समाज आहे त्यांचे मत चालतात परंतु अहिल्यादेवींचे नाव नामांतर चालत नाही काय आजपर्यंत आम्ही केलेल्या अन्यायाबद्दल शांत होतो परंतु आगामी काळात जशास तसे जागा दाखवून देण्याचे काम आम्ही मताच्या माध्यमातून व त्या लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात जाऊन दाखवून देऊ असा देखील सज्जड इशारा शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी व्यक्त केले आहे धनगर समाज हा राज्यामध्ये दोन कोटीच्या घरामध्ये असून या समाजाचा वेळोवेळी प्रत्येकाने मतापुरता वापर करून घेतला आहे तोच वापर खासदार सुजय विखे करताना दिसत आहेत परंतु आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार संघातील 2 लाख ते अडीच लाख दरम्यान असलेला धनगर समाज तुम्हाला तुमचा घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही वेळोवेळी समाजाला भुलथापा देऊन समाजाचे मत घेतलेले आहेत परंतु यापुढे मात्र समाजाला लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही जागृत करू आणि खासदार सुजय विखेंना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे देखील शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी म्हटले आहे

Leave a Reply