Muhurat Trading : लक्ष्मीपूजनाला आज करा मुहूर्ताचे ट्रेडिंग, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी!

[ad_1]

ऑनलाईन डेस्क

दिवाळीत (Diwali) आज गुरुवारी (दि. ४) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजारात एका तासाचे मुहूर्ताचे ट्रेडिंग (Muhurat Trading) सत्र होणार आहे. वर्षातील केवळ एकच दिवस भारतातील भांडवल बाजार (शेअर मार्केट) नियमित वेळेपेक्षा (म्हणजेच सकाळी ९ वाजता उघडून ३.३० वाजता बंद न होता) वेगळ्या वेळेस खुला राहतो. यंदा एका तासाचे मुहूर्ताचे ट्रेडिंग सत्र आज ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता सुरु होऊन ७.१५ वाजता बंद होणार आहे.

लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणूकदारांना समभागांमध्ये व्यवहार करण्याची संधी मिळावी यादृष्टीने गुंतवणूकदारांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली जाते. या दिवशी बहुतांश गुंतवणूकदार दुरच्या अवधीच्या (लाँगटर्म) हिशोबाने चांगल्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी करतात. तसेच काही समभागांच्या गुंतवणुकीमध्ये नफा असल्यास ट्रेडिंगच्या दरम्यान नफ्यातील काही भागाची विक्री करून लक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात नफा घरी आणतात.

काय आहे मुहूर्ताचे ट्रेडिंग? (Muhurat Trading)

नवीन गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीची सुरूवात करण्यासाठी लक्ष्मी पूजनाचा दिवस एक चांगला मुहूर्त ठरू शकतो. दरवर्षी दिवाळीत लक्ष्मी पूजनानिमित्तच्या मुहूर्ताच्या ट्रेडिंगमुळे गुंतवणूकदारांकडून चौफेर खरेदी केली जाते. मुहूर्त ट्रेडिंग दिवाळीत एक तासाचे असते. बीएसईवर १९५७ मध्ये आणि एनएसईवर १९९२ मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी मुहूर्ताचे ट्रेडिंग आयोजित करण्यात आले होते. गेल्या वर्षी या ट्रेडिंगमध्ये BSE सेन्सेक्स ४३,६३८ अंकांवर बंद झाला होता. तर NSE १२,७७१ अंकांवर जाऊन बंद झाला होता. दरम्यान, BSE आणि NSE उद्यापासून दोन दिवस बंद राहणार आहे.

अशी आहे शेअर बाजाराची आजची वेळ

प्री ओपन : सायंकाळी ६ – ६.१५ वाजता

मुहूर्ताचे ट्रेडिंग सेशन : सायंकाळी ६.१५ ते ७.१५ वाजता

क्लोजिंग सेशन- सायंकाळी ७.२५- ७.३५ वाजता

हे ही वाचा :

[ad_2]

Source link

Leave a Reply