नाशिकमधील एका नामांकीत आयटी कंपनीत लव्ह जेहाद करुन तरुणींचं नियोजन पद्धतीने लैंगिक शोषण केलं जात असल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. आरोपी नोकरीची गरज असलेल्या तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचे. यानंतर तिचं आळीपाळीनं लैंगिक शोषण करुन त्यांचं मुस्लिम धर्मात धर्मांतर करायचे.या प्रकरणी आता नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या देखील ठोकल्या आहेत.
आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सर्वांना बुधवारी कोर्टात हजर केलं असता त्यांना १० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता आरोपी पीडित तरुणींना कशा पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढत होते? याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
आरोपी तरुणींना जाळ्यात कसं अडकवायचे?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नवीन नोकरीसाठी आलेल्या किंवा नुकत्याच कंपनीत जॉईन झालेल्या हिंदू मुलींना टार्गेट करायचे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या हिंदू व बौद्ध मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर प्रभाव टाकला जायचा. आरोपींकडून पार्टी, विविध आमिषं आणि मानसिक दबाव निर्माण करून “नोकरी आमच्यामुळेच मिळाली” अशी जाणीव करून देत मुलींवर पकड बसवली जात होती.
यानंतर आरोपी तरुणींचा विनयभंग, अत्याचार आणि बलात्कार करत. आरोपी पीडित तरुणींना कंपनीत सुट्टी टाकायला सांगायचे. फिरायला जायचं सांगून रिसॉर्टवर न्यायचे आणि अत्याचार करायचे. आरोपी एवढ्यावरच थांबायचे नाहीत, तर त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. यामध्ये आरोपी आपल्या मित्रांनाही सामील करून घ्यायचे आणि साखळी पद्धतीने तरुणींचं शोषण केलं जात होतं, अशी माहितीही समोर आली आहे.
तसेच पीडित तरुणींना धर्मांतरासाठी दबाव टाकत नमाज पठण करायला लावणे, गो मांस खाण्यास भाग पाडणे, रोजा ठेवायला सांगणे, तसेच हिजाब घालण्यास भाग पाडत होते, असा देखील आरोप करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी कुणाचा समावेश आहे का? याचा शोध घेतला जात आहे.
सर्व आरोपी उच्च शिक्षित
या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी उच्चशिक्षित इंजिनीयर आहेत. उच्च शिक्षण घेऊनही त्यांच्या डोक्यातून धर्म गेला नाही उलट ते अधिक कट्टर व धर्मांध बनले या प्रकरणात मुस्लिम मुलांना त्यांच्या धर्मातील मुलींची मदत मिळत असे नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर आल्यानंतर केरळा स्टोरी चित्रपट किती वास्तववादी होता हे दिसते.