कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूर : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म.नि.प.नियम २८३ अन्वये सूचना मांडली. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. निर्यातीसाठी परवानगी दिल्यास अडचण निर्माण होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी सरकार कांदा खरेदी करण्यास तयार आहे.

Leave a Reply