[ad_1]
देशात झालेल्या एकूण अपघातांपैकी ग्रामीण भागात झालेल्या अपघातचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. नॅशनल क्रॉईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबीसी) आकडेवारीनूसार २ लाख ११ हजार ३५१ अपघात (५१.६%) ग्रामीण भागात आणि १ लाख ४३ हजार ४४५ (४०.४%) शहरी भागात नोंदवण्यात आली. खराब हवामानामुळे २.४ % रस्ते अपघात झाले. तर,एकूण रस्ते अपघातांपैकी (Road accident) ३१.८% अपघात हे रहिवासी भागाजवळ झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.
Road accident : ३५% लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी
देशात गतवर्षी ३ लाख ७४ हजार ३९७ नागरिकांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला. यातील ३५% लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालातून समोर आली आहे. पंरतु, २०१९ मधील अपघाती मृत्यूच्या तुलनेत २०२० च्या संख्येत घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ही संख्या ४ लाख २१ हजार १०४ एवढी होती. २०२० मध्ये दर १ लाख लोकसंख्येमागे अपघातातील मृत्यूचे प्रमाण २७.७% होते. २०१९ मध्ये हे प्रमाण ३१.४% एवढे होते. २०२० मध्ये देशात ३ लाख ५४ हजार ७९६ रस्ते अपघाताची नोंद झाली. यात १ लाख ३३ हजार २०१ लोकांचा मृत्यू झाला आणि ३ लाख ३५ हजार २०१ रूग्ण जखमी झाले.
Road accident : दुचाकीस्वाराच्या मृत्यूचे प्रमाण ४३.६%
या अहवालातून ६० टक्क्यांहून अधिक रस्ते अपघात हे वेग मर्यादा ओलांडल्याने झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. या अपघातांमध्ये ७५ हजार ३३३ लोकांचा मृत्यू झाला. तर, २ लाख ९ हजार ७३६ नागरिक जखमी झाले. एनसीआरबीच्या अहवालानूसार रस्ते अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूचे प्रमाण ४३.६% होते. कार, ट्रक अथवा लॉरी आणि बसेसच्या अपघातांचे प्रमाण १३.२ टक्के एवढे आहे. अती वेग वाहन चालवणे अथवा ओव्हरटेकिंगमुळे २४.३ टक्के रस्ते अपघात झाले. या अपघातांमध्ये ३५ हजार २१९ मृत्यू तर, ७७ हजार ६७ लोक जखमी झाले.
२०२० मध्ये एकूण १३ हजार १८ रेल्वे अपघातांची नोंद झाली. यात १ हजार १२७ लोक जखमी झाले आणि ११ हजार ९६८ लोकांचा मृत्यू झाला. ७०% रेल्वे अपघात हे ट्रेनमधून पडल्याने किंवा ट्रेनच्या धडकेने झाले आहेत. रेल्वे क्रॉसिंग अपघाताच्या १ हजार १४ घटनांमध्ये १ हजार १८५ जणांचा मृत्यू झाला आणि ७१ लोक जखमी झाले.उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक रेल्वे क्रॉसिंग अपघातांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण घटनांपैकी ३८० घटना घडल्या (३७.५%).
हे ही वाचलं का?
[ad_2]