[ad_1]
भांडवली बाजाराचे नियंत्रण करणार्या सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) अध्यक्षपदासाठी केंद्र सरकारने अर्ज मागविले आहेत. सेबीचे विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी यांचा कार्यकाळ येत्या फेबु्रवारी महिन्यात संपणार आहे.
या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाकडून सेबीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे. भारतीय प्रशासनिक सेवेच्या 1984 च्या हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी असलेल्या अजय त्यागी यांची 2017 साली सेबीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती.
अजय त्यागी यांची सुरुवातीला तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. कमाल पाच वर्षांच्या सेवेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. सेबी अध्यक्षपदासाठी उमेदवार 6 डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.
[ad_2]