आष्टीत भाजपचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न. सुरेश धस सलग सहा दिवस घरीही गेले नाहीत.प्रदेश भाजपचे वेधले लक्ष.

आष्टी

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेत काम करत असताना प्रशिक्षित असावे या साठी पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन संपूर्ण भारतभर केले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील इतर मतदारसंघाने आदर्श घ्यावा असे प्रशिक्षण शिबिर आष्टी मतदारसंघात तीन ठिकाणी नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळे अंतर्गत कार्यकर्त्यांची प्रशिक्षण व्हावे यासाठी संपूर्ण भारतभर कार्यशाळा सुरू आहेत आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध शिबिरे घेऊन प्रदेश भाजपचे लक्ष वेधले आहे. शिरूर कासार,पाटोदा, व कडा या ठिकाणी ही शिबिरे संपन्न झाली विशेष म्हणजे या तिन्ही ठिकाणी प्रदेश पातळीवरील वक्त्यांची उपस्थिती होती. केशव उपाध्य, नवनाथ बन प्रकाश गाडे, किरण पाटील,स्वरूप सिंह हजारी, चंद्रकांत फड, देविदास नागरगोजे यांच्यासह इतर मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर हा विषय पवन मोगरेकर व दत्ता महाजन यांनी कार्यकर्त्यांना व्यवस्थित समजावून सांगितला.

या प्रशिक्षण शिबिरादरम्यान आमदार सुरेश धस सलग सहा दिवस कार्यस्थळी कार्यकर्त्यांसोबत मुक्कामी होते. कार्यकर्त्यांसोबत राहत असताना सुरेश धस सहा दिवसात एकदाही घरी गेले नाहीत संपूर्ण वेळ ते प्रशिक्षण शिबिरात पूर्ण वेळ उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरा अंतर्गत अंत्योदय, भाजपचे वैचारिक अधिष्ठान, भाजपचा इतिहास यासह सोशल मीडिया नमो व सरल ॲपचा कार्यकर्त्यांनी कसा वापर करावा हे विषय घेण्यात आले.दरम्यान भारतीय जनता पक्षाने घालून दिलेल्या नियमा अंतर्गत अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करून प्रदेश भाजपचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply