लसीकरणामुळे देशावरील ओमायक्रॉन लाटेचे संकट टळले; आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती

 

नवी दिल्ली, वृत्तसेवा

देशव्यापी लसीकरणामुळे कोरोनाच्या ओमायक्रॉन लाटेचे (Omicron wave) संकट टळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Health Minister Mansukh Mandaviya) यांनी शुक्रवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. कोरोना संकटकाळात देशाला वेळोवेळी मार्ग दाखविण्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलने मोलाची कामगिरी बजावली असल्याचेही मंडाविया यांनी नमूद केले.

जगातील अनेक देशात जेव्हा ओमायक्रॉन लाटेने धुमाकूळ घातला होता, त्यावेळी भारत यशस्वीपणे या लाटेचा सामना करीत होता, असे सांगून मांडविया पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम व्यवस्थापन आणि वेगाने राबविलेली लसीकरण मोहीम यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट थोपविता येऊ शकली.

गतवर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती, त्यावेळी डेल्टा स्ट्रेनने असंख्य लोकांचा बळी घेतला होता. तिसरी ओमायक्रॉन स्ट्रेनची लाट डिसेंबर 2021 पासून आली होती. पण डेल्टाच्या तुलनेत ही लाट सौम्य होती. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 184.31 डोसेस देण्यात आले आहेत.

Source link

Leave a Reply