शेतकऱ्यांसाठी ‘ही’ योजना आहे खास…जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 

Government schemes सरकारी योजना-शेतीतील विविध प्रकारची मशागत करण्यासाठी शेतकरी बांधवांना अनेक प्रकारची अवजारे लागतात.सध्या बैलाद्वरे मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे.आता बैलाची जागा ट्रॅक्टर, पॉवर टिलर या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त साधनांनी घेतली आहे.छोट्या शेतकरी बांधवांना ही साधने विकत घेणे परवडत नाही.त्यामुळे सरकार शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषी विभागा मार्फत एक महत्वपूर्ण योजना राबवते ती योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषीविषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या योजनेविषयी आज आपण जाणून घेऊया…

 

पात्र लाभार्थी – 

१)सर्व खातेदार शेतकरी

२)शेतकरी गट

३)एफपीओ

४)सहकारी संस्था

 

आवश्यक कागदपत्रे – 

१)7/12 व 8 अ

२)आधारकार्ड छायांकित प्रत

३)आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची प्रत व संवर्ग प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

कोणती औजारे मिळतील – 

कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिटस भाडे तत्वावर कृषी यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (औजारे बँक) यांचा समावेश असणार आहे. यात अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकरी व महिलांना ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख व इतर बाबींसाठी 50 टक्के औजारे अशी मदत मिळणार आहे. इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख तर इतर औजारेसाठी 40 टक्के किंवा मंजूर कमाल अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. औजारे बँक या घटकांतर्गत समाविष्ट बाबींमध्ये ट्रॅकर आणि इतर पसंतीनुसार औजारे यांचा समावेश असणार आहे .10 लाखापर्यंत अनुदान 40 टक्के (चार लाख), 25 लाखापर्यंत 40 टक्के अनुदान (10 लाख) असणार आहे.

 

संपर्क – अधिक माहितीसाठी mahadbtmahait.gov.in ही राज्य सरकार ची अधिकृत वेबसाईट (संकेतस्थळ) आहे.या वेबाइटवरून आपण यासाठी अर्ज करू शकता.तसेच अधिक माहिती साठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply