अजित पवारांनी सर्व कार्यक्रम रद्द केले भाजपचे दोन मोठे नेते अचानक दिल्लीत

 

मुंबई प्रतिनिधी

आज महाराष्ट्र भाजप मधील दोन महत्वाच्या नेत्यांनी तडकाफडकी दिल्ली जवळ केली असून अजित पवारांनीही आजचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय क्षेत्रात काहीतरी घडतं असल्याने सर्वांच्या नजरा अजित पवारांवर खिळल्या आहेत.

अजित पवार भाजप मध्ये येणार आहेत किंवा राष्ट्रवादीचा एक गट भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समाज माध्यमात येत आहेत.त्यात आज अचानक चंद्रशेखर बावनकुळे व आशिष शेलार यांनी त्यांचे कार्यक्रम रद्द करून तडकाफडकी दिल्ली जवळ केली असून अजित पवारांनीही आजचे त्यांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द केल्याने राजकीय क्षेत्रात काहीतरी घडणार या शक्यतेने सर्वांच्या नजरा अजित पावर यांच्यावर खिळल्या आहेत. दरम्यान शरद पवार व सुप्रिया सुळे बारामतीत असल्याचे समजते.

Leave a Reply