देशमुख यांच्या जामिनला सीबीआयचे आव्हान; कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला असला तरीही अनिल देशमुख कोठडीतच राहणार आहेत. सीबीआयच्या मागणीमुळे अजून १० दिवस तरी अनिल देशमुखांची सुटका होणार नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन दिल्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान दिलं आहे. सीबीआय आता या विषयी पुढे दाद मागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी आता १० दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जामीनाचा आदेश स्थगित करावा, अशी मागणी सीबीआयने केल्याची माहिती देशमुखांचे वकील अनिकेत कदम यांनी दिली आहे.