पठाण म्हणजे हॉलीवूड अ‍ॅक्शनपटाची स्वस्त कॉपी!’ ‘या’ दिग्दर्शकाची टिका 

अ‍ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ

मुंबई: शाहरुख खानचा नवीन चित्रपट पठाण हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात आहे. चित्रपट हिट झाला की प्लॉप? याविषयी लोकांच्या मनात संभ्रम असताना आता बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने केलेल्या टीके मुळे हा संभ्रम आणखीनच वाढला आहे.अनुरागनं बॉलीवूडचे चित्रपट आणि हॉलीवूडची संकल्पना याचा संबंध जोडत दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. अनुराग म्हणतो की, हिंदी चित्रपट हे हॉलीवूडच्या चित्रपटाची स्वस्तात मस्त कॉपी आहे. त्यामुळे त्यांचे निर्मिती मुल्य काय आहे हे आपल्याला माहिती आहे.

एक काळ असा होता की, विदेशामध्ये बॉलीवूडच्या चित्रपटांचा वेगळाच प्रभाव होता. आता तो काही पाहायला मिळत नाही. बऱ्याचकाळापासून बॉलीवूडचे चित्रपट हे जगभर गाजताना दिसत आहेत. मात्र आता आपण ओरिजनल चित्रपट बनविण्याचे कष्ट घेत नाही ही खरी मोठी समस्या आहे. आपला मेन स्ट्रीम सिनेमा हा हॉलीवूडच्या अॅक्शन चित्रपटांची स्वस्तात मस्त कॉपी काढण्यात व्यस्त आहे. असेही कश्यप यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शाहरुख खान ने आपले स्टारडम टिकून ठेवण्यासाठी बॉयकॉट मोहिमेला घाबरून स्वतःच्या पैशाने थिएटर बुक केली व नाव जबरा फॅन्सचे दिले अशी चर्चा होत आहे.एकीकडे टिव्ही चैनल वृत्तपत्रे पठाण चित्रपट हिट झाल्याचे सांगत असले तरी बॉयकॉट मोहीमवाले मात्र बुक माय शो सारख्या वेबसाईट वरील पठाण च्या बुकिंग चे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर करून न्यूज चॅनेल चा दावा खोडून काढत आहेत. त्यामुळे पठाण खरोखरच हिट झाला की फक्त बातमीमध्ये हीट झाला हा संभ्रम मात्र कायम आहे.

Leave a Reply