माजलगाव दी 27 प्रतिनिधी
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती माजलगावात आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरी करण्यात आली. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष हनुमान कदम यांनी अटलबिहारी वाजपेयींचे जीवन चरित्र समाजकारणात सक्रिय असणाऱ्या विविध व्यक्तींना भेट दिले.यापूर्वीही त्यांनी अटजींच्या शेकडो प्रतिमांचे वाटपही केले होते.
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरी करण्यात येते या दिनाचे औचित्य साधून भाजपचे देशभरातील कार्यकर्ते विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करीत असतात परंतु या सर्व उपक्रमात माजलगाव येथील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष हानुमान कदम यांनी
अटलजींचे जीवन चरित्र सामाजिक जीवनात सक्रिय असणाऱ्या विविध विचारसरणीच्या व्यक्तींना भेट दिले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दयानंद स्वामी, आधार मल्टिस्टेटचे सुनील सौंदरमल, व्यापारी संघाचे सुरेंद्र रेदासनी, बहुजन पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष पत्रकार संजय मालानी,शिवसेना शिंदे गटाचे माजलगाव तालुका प्रमुख तुकाराम बापू येवले सहित अनेक व्यक्तींना अटलजींचे जीवन चरित्र भेट देण्यात आले.चरित्र भेट देणारे हनुमान कदम हे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष असून त्यांनी यापूर्वी अटलजींच्या शेकडो प्रतिमा समाजातील विवीध क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना भेट दिल्या होत्या तसेच त्यांच्या कोथरुळ या गावात हनुमान कदम यांनी नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत संकल्पनेचा आदर्श घेऊन सरस्वती नदीच्या काठावर वृक्षारोपण करून शेकडो वडाची झाडे चांगल्या प्रकारे त्यांनी जोपासली आहेत.दरम्यान अटलजींचे चरित्र भेट देण्यामागे त्यांचे जीवन चरित्र वाचून सामाजिक जीवनात सक्रिय असणाऱ्या व्यक्तींनी आदर्श घ्यावा अशी भूमिका असल्याचे मत कदम यांनी मांडले.दरम्यान हानुमान कदम यांच्या या उपक्रमात अनेक भाजप कार्यकर्ते सहभागी होते.