मुंबई:विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होईल, असे मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या ४थ्या बैठकीत सांगितले.
पुणे येथे १० हजार कोटींचा देशातला पहिला ईलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प होईल. गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटींच्या स्टील प्रकल्पास मान्यता दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांची विशेष गरज लक्षात घेता औद्योगिक तंत्रज्ञान उद्यान विकसित करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.