Tik -Tok स्टारच्या अनपेक्षित एक्झीटने चाहते हळहळले…!

बीड: Tik-tok स्टार संतोष मुंडेसह बाबुराव मुंडे या दोन तरुणाचा विजेच्या धक्क्याने मंगळवारी साय.७ वाजण्याच्या दरम्यान भोगलवाडी येथे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे परिसर व चाहत्या मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, किल्ले धारूर तालुक्यातील भोगालवडी येथील Tik-tok स्टार संतोष मुंडे व त्यांचा मित्र बाबुराव मुंडे हे डीपीवरील फ्युज टाकत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने ते कोसळले. ग्रामस्थांनी त्यांना तेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. Tik-tok स्टार संतोष मुंडे हे social media मध्ये विनोदी कलाकार म्हणुन ओळखले जात होते. त्यांच्या अपघाती मृत्युने सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply