आता मागेल त्याला मिळणार बीबीएफ पेरणी यंत्र!

३५ हजार अनुदान; येथे करा अर्ज BBF Perani yantra 

Board bed and furrow machine subsidy scheme of Maharashtra

पुणे: शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढून शेतकऱ्यांचे शेतीतील कष्ट कमी व्हा, या उद्देशाने शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते. शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, यासाठी प्रोत्साहन म्हणून शासन शेतकऱ्यांना विविध यंत्रे खरेदी करण्यासाठी अनुदान सुद्धा देते. काही यंत्रासाठी ५० टक्के तर काही यंत्रे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येतात. आज आपण बीबीएफ पेरणी यंत्र (BBF Perani Yantra Anudan Yojna) अनुदान योजना बाबत माहिती घेणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करायचा,किती अनुदान मिळेल? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती शेवट पर्यंत वाचा…

 

राज्य सरकारने नुकतेच बीबीएफ पेरणी यंत्र (रुंद सरी वाफा पेरणी यंत्र) अनुदान योजनेत बदल केला असून आता नवीन योजनेनुसार मागेल त्याला बीबीएफ पेरणी यंत्र अनुदानावर उपलब्ध होणार आहे. या यंत्राच्या साह्याने पेरणी केल्यास शेतकऱ्यांना फायदा मिळतो. पाऊस जास्त असणे, पाऊस कमी असणे किंवा पावसात खंड पडणे या गोष्टीचा परिणाम या यंत्राने पेरणी केल्यास कमी प्रमाणात होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळण्यास मदत होते. म्हणून राज्य सरकारने सन 2023-24 मध्ये सर्व शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध व्हावे,या उदात्त हेतूने सदर योजनेत बदल केला असून आता प्रत्येकाला हे पेरणी यंत्र अनुदानावर उपलब्ध होणार आहे.

 

किती मिळेल अनुदान? BBF yantra subsidy 

मागेल त्याला बीबीएफ पेरणी यंत्र ही योजना राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या दोन प्रकारच्या बीबीएफ पेरणी यंत्रासाठी अनुदान उपलब्ध आहे.सदर योजने अंतर्गत पेरणी यंत्राच्या एकूण किमतीच्या 50% रक्कम किंवा जास्तीत जास्त 35 हजार रुपये. यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान स्वरूपात मिळतात.

येथे करा अर्ज

How to apply for BBF Perani Yantra

सदर पेरणी यंत्रासाठी आपण अर्ज करू इच्छित असाल तर आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या महा डीबीटी (Maha dbt) या शेतकरी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठीची विस्तृत माहिती स्टेप बाय स्टेप प्रमाणे खाली देत आहोत:

1) या योजनेसाठी अर्ज करताना आपण आपल्या पर्सनल कॅम्पुटर किंवा मोबाईल मध्ये महाराष्ट्र शासनाची महाडीबीटी फॉर्मर पोर्टल ही वेबसाईट ओपन करावी. वेबसाईट ओपन करताना बोगस वेबसाईट उघडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या सोयीसाठी महाडीबीटी ची लिंक खाली देत आहोत.

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

2) साईट ओपन झाल्यानंतर प्रथम नोंदणी करून घ्या. आपण यापूर्वी नोंदणी केलेली असेल तर युजरनेम व पासवर्ड वापरून थेट लॉगिन करा.

3) लॉगिन केल्यानंतर “अर्ज करा” या कमांड वर क्लिक करावे. त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनवर क्लिक करा.

4) कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ट्रॅक्टर पावर टिलर चलीत अवजारे या पर्यायावर क्लिक करून पेरणी व लागवड यंत्र यावर क्लिक करावे.

5) आता आपणास ज्या पेरणी यंत्रासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करून आपला अर्ज जतन (Save) करायचा आहे.

6) अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील ही शेवटची स्टेप असणार आहे. या मध्ये तुम्हाला याच वेबसाईटवर पुन्हा येऊन अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर पेमेंट करावे लागेल.पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमचा अर्ज दाखल (Submit) होईल.

 

अशा पद्धतीने आपण बीबीएफ पेरणी यंत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या प्रक्रियेविषयी काही शंका असेल किंवा आपण संगणक साक्षर नसाल तर यासाठी आपण सेतू सुविधा केंद्र किंवा ऑनलाईन सर्व्हिस सेंटरवर जाऊन सेंटर चालकाची मदत घेऊन आपला अर्ज सबमिट करू शकता. शेतकरी बांधवांनो अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच सरकारी योजना, सरकारी नोकरी व राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला अवश्य जाईन व्हा. ही माहिती आवडली असेल तर आपले मित्र व नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. ग्रुपची लिंक खाली देत आहोत:

https://chat.whatsapp.com/EtVPNaxyHO7Lr7mw1Ijrkv

Leave a Reply