बीड मधे हेमाडपंती मंदिराची झाली कचराकुंडी बीड मधील हिंदूंना आवाहन

बीड हे ऐतिहासिक वारसा असणारं नगर म्हणून ओळखण्यात येतं. नगरात ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या कैक इमारती आहेत परंतु बीड नगरात हिंदूंच्या एका हेमाडपंती मंदिराची दुरावस्था झाली आहे. हे हेमाडपंती मंदिर आहे का कचरा कुंडी हे ओळखणही अवघड झालं आहे. बीड नगरातील मिलिया महाविद्यालयाच्या पाठीमागे हे पुरातन हेमाडपंती मंदिर आढळून आले आहे.

 

hi

हिंदूंचा इतिहास जाज्वल्य आहे देशभरात उत्कृष्ट स्थापत्य रचना असलेले हजारो मंदिरे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात परंतु हिंदूं धर्माच्या संस्कृतीची महती सांगणाऱ्या अनेक मंदिराकडे हिंदूंचेच दुर्लक्ष झाल्याने ही मंदिरे खंडर बनली आहेत याच प्रकारचे एक उदाहरण बीड मधे उजेडास आले असून बीडमधील कागदी वेस मिलिया महाविद्यालयाच्या पाठीमागे एक पुरातन हेमाडपंथी मंदिर आढळून आले आहे या मंदिराची अक्षरशः कचराकुंडी झाली असून परिसरातील घाण या मंदिरात फेकण्यात येण्यासाठी या हेमाडपंथी मंदिराचा वापर होत आहे. बीड नगरातील जुनी जाणती मंडळी हे महालक्ष्मी देवीचं पुरातन मंदिर असल्याचे सांगत आहे. महाराष्ट्रात देवींची अनेक ठाणी आहेत परंतु हेमाडपंती रचना असलेले देवींचे मंदिरे तुळजापूर, कोल्हापूर,माहूर व सप्तशृंगी या शिवाय इतरत्र फारसे आढळत नाहीत. बीड मधील देवीचे हे मंदिर हेमाडपंती असल्याने या मंदिराचा इतिहास खूप मोठा असू शकतो.या मंदिराचा उपयोग परिसरातील घाण टाकण्यासाठी होत असून बीड नगरातील हिंदू बांधवांनी या मंदिराची स्वछता करून दिवा बत्ती सुरू करावी असे आवाहन सोशल मीडियातून होत आहे.

Leave a Reply