22 तारखेला लग्न, नवरदेव ‘अधिकारी’; मग सुशिक्षित तरुणी गुन्हेगारासोबत का पळणार? पडळकर स्पष्टच म्हणाले की.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Bhigwan News) तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी दुपारी एका 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून घरी परतत होती
मात्र, वाटेतच दोन जणांनी मिरचीपूड टाकून आणि मारहाण करून तिला टेम्पोमध्ये बसवून नेले. असे कळल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे 22 तारखेला लग्न ठरले होते. खरेदी करून दुचाकीवरून घरी जात असताना आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांनी त्यांना गाठले आणि तरुणीला सोबत घेऊन गेले. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात तरुणीने आपण स्वमर्जीने गेल्याचे सांगितले आहे. मुलीचे नातेवाईक हा दावा फेटाळत असून, तिला धाक दाखवून किंवा ब्लॅमेल करून असे बोलायला लावले जात असल्याचे सांगत आहेत. मुलीच्या मामाने तर मुलगी परत मिळाली नाही तर आत्महत्येचा इशारा दिला आहे.

भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी या घटनेमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले कि, जर हे प्रेमप्रकरण असते, तर पळवण्याची गरज काय होती? ते शेजारीच राहतात, मग असा मार्ग का निवडला?

इंदापूर तालुक्यात अशा 25 मुलींची प्रकरणे घडल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे. ज्या मुलींना वडील नाहीत किंवा ज्यांच्या नावावर मालमत्ता आहे, अशा मुलींना टार्गेट करून त्यांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

गंभीर गुन्हे दाखल असलेला मुख्य सूत्रधार अझहर हतबल मुलींना टार्गेट करत असल्याचा आरोप आमदार पडळकरांनी केला आहे. ज्या मुलींना वडील नाहीत किंवा ज्यांच्या नावे मालमत्ता आहे, त्यांना जाळ्यात ओढून, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झालेल्या तरुणाशी विवाह ठरलेला असताना, डी. फार्मसी झालेली सुशिक्षित मुलगी अशा गुन्हेगारासोबत का पळून जाईल, पोलीस प्रशासनाने आता त्या मुलीला याबद्दल सांगावे. आत्ता तरुणी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अधिकृत माहिती समोर आल्यानंतर सगळी माहिती समोर येईल असेही त्यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply