बीड जिल्ह्यातून ‘यांना’ मिळाली संधी!
नागपुर: येत्या 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी घोषित केले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकांना एक वर्ष बाकी असले तरी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच निवडणुकांची जंगी तयारी केल्याचे या यादीवरून दिसत आहे.
बीड जिल्ह्यातून यांना मिळाली संधी
प्रदेश कार्यकारणी मध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून बीड जिल्ह्यातील खालील सहा नेत्यांना संधी मिळाली आहे. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार आर टी देशमुख, भाजपकडून 2019 ची माजलगाव विधानसभा लढवलेले रमेश आडसकर, डॉ. स्वरूपसिंग हजारी,श्रीहरी विठ्ठलराव मुंडे या सहा नेत्यांची प्रदेश कार्यकारणी मध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. माजलगाव चे माजी आमदार आर टी देशमुख यांचे तब्बल सातव्यांदा प्रदेश कार्यकारणीवर निवड झाली आहे.