Ajit Pawar : माढ्यात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे, एक जण ताब्यात

सोलापूर: जिल्ह्यातील माढा येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

आज माढा येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यास संबोधनासाठी अजित पवार उभे राहिले आणि त्यांचे भाषण सुरु होताच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.

राज्यात मराठा व धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे.राज्यातील अनके गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय देखील घेण्यात येत आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील माढा लोकसभा मतदार संघात बंदी घातल्याचीघोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली होती. त्या पार्श्वभुमिवर कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यामुळे, सभेच्या ठीकाणी,कारखाना परीसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तसेच सभेच्या ठीकाणी शेतकऱ्यांचे रुमाल आणि मोबाईल फोन तपासूनच प्रवेश देण्यात आला होता.

Leave a Reply