प्रत्येक हिंदूच्या घरात शिवचरित्र असलेच पाहिजे!

 

ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांचे प्रतिपादन

नागपूर: “ज्या प्रमाणे प्रत्येक हिंदूंच्या घरात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा व दासबोध असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक हिंदूंच्या घरात शिवचरित्र हे असेलच पाहिजे”,असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी केले. दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळतर्फे श्री गणेश उत्सवात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या शुभ हस्ते आज बुधवारी धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज लिखित शककर्ते शिवराय ह्या ६ व्या शिव आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती संयोजक दत्ता शिर्के यांनी सुरवातीला प्रास्ताविक केले. शिरीष महाराज पुढे म्हणाले, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व आज हा संदर्भ ग्रंथ आहे. ३५० वा श्री शिवराजाभिषेक वर्षानिमित्त छत्रपती सेवा प्रतिष्ठानाने हे १८००/- रुपयाचे २ खंड (१२०० चे पानांचे) कसलाही फायदा न घेता केवळ ५००/- रुपयात उपलब्ध करून दिले आहेत, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे असेही ते म्हणाले. सद्गुरूदास महाराजांनी लिहिलेले हे शिवामृत अखंड भारत वर्षाला आपण अर्पण करत आहे, ह्याचा अभिमान आहे.

सुरवातीला दुर्गाताई इस्केलवार ह्यांनी स्त्रीशक्ती ह्या विषयावर संबोधन केले. त्यांचा सत्कार मंडळाच्या वतीने हरदास ह्यांनी केला. ह. भ. प. शिरीष महाराज मोरे ह्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष रॉबिन जयपुरकर ह्यांनी केला.त्यानंतर त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे कार्य व आजचा संदर्भ ह्या विषयावर संबोधन केले. ते म्हणाले की, स्वराज्याची स्थापना होण्यापूर्वी ना समाज सुरक्षित होता ना देव सुरक्षित होते. ही क्रूरता महाराजांच्या काळापर्यंत सुरू होती. अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले, हे थोडे थोडके उपकार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपल्या अंगणातील तुळस व मंदिरातील कळस टिकून राहिला. इतिहासात मुस्लिम अत्याचारांच्या अनेक घटना त्यांनी सांगितल्या. त्यावेळेस अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. ते असेही म्हणाले की, त्यावेळचे मुस्लिम राजवटीचे अत्याचार आपल्यासमोर येऊच दिले गेले नाही.

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आणि चरित्राचा विविध प्रसंगामधून मागोवा घेत उपस्थितांसमोर महाराजांचे ज्वलंत रूप उभे केले. ह्या कार्यक्रमाचे सुंदर संचालन घटवाई हिने केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply