चंद्रकांत पाटलांचा मोठेपणा; शाईफेकी नंतर शिंदे-फडणवीसांना हात जोडून केली ‘ही’ विनंती…

पिंपरी चिंचवड: भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी वेळप्रसंगी समाजाकडे भीक सुद्धा मागितली असं वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या वक्तव्यामागील भूमिका लक्षात न घेता मी दिलगिरी व्यक्त केल्यावरही टिका केली, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

काल (१० डिसेंबर) पाटील यांनी एका कार्यकर्त्याचे घरी भेट देण्यास आले असता या वक्तव्याचा निषेध करत पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर एकाने शाईफेक केली. या घटनेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनाचा मोठपणा दाखवत अत्यंत संयंत भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती करत असे म्हटले की, ‘या प्रकरणात पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वर निलंबनाची कारवाई करून त्यांचे कुटुंब उध्वस्त करू नये’. नियमानुसार या प्रकरणाची चौकशी होईल परंतु पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करू नये. भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी म्हटले की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जो आदेश देतील त्याप्रमाणे आपण वागायचं आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कायद्याने चालायला शिकवले आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघाले आहेत पण मी त्यांना माझी शपथ देऊन सांगितलं की कृपया इकडे येऊ नका. आपापल्या घरी परत जा. माझा एक कार्यकर्ता फोन वरती रडायला लागला व इकडे येण्याचा हट्ट करू लागला तर मी त्याला सांगितले की माझ्या शपथेला काय अर्थ आहे? चंद्रकांत पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवत घेतलेल्या भूमिकेचे स्वागत होत आहे.

शाईफेक प्रकरणी ११ पोलिस निलंबित

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत चंद्रकांत पाटील म्हणाले की पोलिसावर केलेले निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे विन ंती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे.

Leave a Reply