राज्यांचे ब्रँडिंग करताना लोकसहभाग महत्त्वाचा-नरेंद्र मोदी

मुंबई: G20 परिषदेच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्यांचे ब्रँडिंग करताना, कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन यावेळी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

उद्या १२ डिसेंबरपासून G20 परिषदेच्या बैठकांना मुंबईत सुरूवात होणार असून त्यासाठी शहर सज्ज आहे. राज्याची सांस्कृतिक परंपरा, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवितानाच राज्यातील गुंतवणूकक्षम क्षेत्रांची ओळख परदेशी पाहुण्यांना करून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply