चंद्रशेखरराव अख्खे मंत्रीमंडळ घेऊन पंढरपूरात धडकणार

भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे येत्या 27 जून रोजी पंढरपुरात दाखल होणार असून वारकऱ्यांची ते चर्चा करणार आहेत. दरम्यान चंद्रशेखर राव तब्बल 500 गाड्यांचा ताफा घेऊन पंढरपुरात दाखल होणार असून त्यांच्यासोबत तेलंगणाचे अख्खे मंत्रिमंडळ ही पंढरपुरात येणार असल्याने राजकीय चर्चांना चांगलेच उधान आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या दर्शनासाठी कुणीही येऊ शकतो मात्र वारीला समोर ठेवून यात कुणीही राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी या निमित्ताने चंद्रशेखर राव यांना दिला आहे दरम्यान भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात चांगलीच सक्रिय झाली असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बी.आर.एस पक्षाच्या दोन महत्वाच्या नेत्यांना फॉर्च्यूनर गाडी देण्यात येणार असल्याची  राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Leave a Reply