‘गोदाकाठचा कृषीसाधक:दादा पवार’ पुस्तकाचे विमोचन
परभणी, दि.१७ (प्रतिनिधी): आचरणात धर्म असणारा माणुस देवालाही हवा असतो. अशी माणसेच ईश्वरी कार्य करु शकतात. माणसाचे जीवन हे ईतरांना ऊर्जा देण्यासाठी असते. अशा दैवदुर्लभ व्यक्ती संघाला मिळाल्या त्यामुळे स्व. दादा पवार यांच्यासारखी माणसे संघाला मिळाली म्हणुन संघाची प्रतिष्ठा वाढली असे प्रतिपादन अखिल भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी गुरुवार दि. १७ नोव्हेंबर रोजी परभणीत केले.
येथील वनामकृवि येथे स्व. दादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त “गोदाकाठचा कृषीसाधक;दादा पवार” या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हभप अच्युत महाराज कानसुरकर, प्रांत संघचालक अनिल भालेराव, डाॕ. दत्तात्रय मगर, रविंद्र गोळे, लक्ष्मण (तात्या) पवार आदींची ऊपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना भय्याजी जोशी म्हणाले, स्व. दादा पवार यांच्यासारखे आयुष्य म्हणजे पुर्वजन्माचे सुकृत असते. विविध आदर्श पैलु त्यांच्या आयुष्याकडे पाहील्यास दिसुन येतात. आदर्श जीवनाचे मापदंड हेच त्यांचं आयुष्य होते. साधनेच्या रुपाने शेती करत दादा साधक आणि कर्मयोग्याचं आयुष्य जगले म्हणुन जनुभाऊ रानडे यांच्या रुपाने संघच दादांना शोधत गेला. त्यांच्या संघात येण्याने देवगिरी प्रांताची शक्ती वाढली. वझुरसारख्या छोट्या गावातुन येऊन त्यांनी प्रांत संघचालकाची जबाबदारी लिलया सांभाळली. संघात देवदुर्लभ काम करण्याची ताकद आहे ती अशा माणसांमुळेच आहे त्यामुळे कर्माची ऊर्जा घेऊन कर्मप्रवण होणारी माणसे दादांच्या श्रेणीत असतात, असेही ते म्हणाले. अध्यक्ष हभप अच्युत महाराज कानसुरकर यांनी अध्यक्षिय समारोपात दादांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
सुरवातीला स्मृतिग्रंथ प्रकाशन समितीचे अध्यक्ष डाॕ. दत्तात्रय मगर यांनी पुस्तकासंदर्भातील भुमिका विषद केली. प्रास्ताविक रावजी लुटे, सुत्रसंचालन बाबाराव माटे तर आभार डाॕ. रामेश्वर नाईक यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप शांतिमंत्राने झाला. कार्यक्रमाला जिल्हाभरातुन स्वयंसेवक, वझुर ग्रामस्थ, नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने ऊपस्थिती होती.