भारतीय किसान संघाच्या दणक्याने गंगावाडीतील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत!

भारतीय किसान संघाचे प्रांत अध्यक्ष बळीराम सोळंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रमक

गेवराई, दि.१७(प्रतिनिधी): गंगावाडी येथील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने आज येथील तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.भारतीय किसान संघाचे प्रांत अध्यक्ष बळीराम सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचा पवित्रा पाहून प्रशासनाने नमते घेत चार तासात वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला आहे.

ऐन रब्बी पिकांच्या पेरणी वेळीच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा काल खंडित केला होता. त्यामुळे शेतकऱ्यां समोर एक मोठे संकट उभे राहिले होते.ज्वारी, गहू, हरभरा व इतर रब्बी पिके कशी पेरायची आणि पुढे उदरनिर्वाह कशावर करायचा ? हा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने भारतीय किसान संघाच्या वतीने दिनांक 16 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनास भारतीय किसान संघाचे प्रांत अध्यक्ष बळीराम सोळंके यांनी माननीय अध्यक्ष राज्य अन्न अयोग,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक 21 :10: 2022 रोजी घेतलेल्या सुनावणीच्या निर्णयाची प्रत तहसीलदार यांचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी आणि विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांना देऊन प्रतिपादन केले की या निर्णयाच्या विरोधात विद्युत वितरण कंपनी काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत बिलाची वसुली करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करणे हा पर्याय नाही. आयोगाच्या निर्णयानुसार इतर पर्यायाने वीज बिल वसूल करावे, जर आपण विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही तर; आलेले सर्व शेतकरी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करतील आणि सतत चार तास धरणे आंदोलन केले तेव्हा शेतकरी आक्रमक झाले परिस्थिती हाताबाहेर जाते की काय असे अधिकाऱ्यांना वाटल्याने त्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा सुरू केला आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला यावेळी शेकडो शेतकरी आंदोलनात उतरले होते अशा पद्धतीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी भारतीय किसान संघाला यश आले.

Leave a Reply