Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषण कमी होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

[ad_1]

नवी दिल्ली : वृत्तसेवा

नेहमीप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण ( Delhi Air Pollution ) वाढले असले तरी जोरदार वाऱ्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत ते कमी होईल, असा अंदाज पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत दिल्लीत शनिवारी हवा स्वच्छ होती. वेगवान वाऱ्यामुळे हवेतील प्रदूषक तत्वे कमी झाल्याचेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

( Delhi Air Pollution ) दिल्लीतील एअर क्वालिटी निर्देशांक (एक्यूआय) 449

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऍपनुसार दिल्लीतील एअर क्वालिटी निर्देशांक (एक्यूआय) 449 वर आला आहे. शुक्रवारी हा निर्देशांक 462 वर होता. ( Delhi Air Pollution ) शून्य ते 50 दरम्यान एक्यूआय असेल तर हवा स्वच्छ मानली जाते. हेच प्रमाण 101 ते 200 च्या दरम्यान असेल तर हवा साधारण स्वच्छ मानली जाते. हे प्रमाण 201 ते 300 पर्यंत असेल तर हवा खराब मानली जाते. निर्देशांक 301 ते 400 च्या दरम्यान असेल तर हवा खूप खराब आहे, असे मानले जाते तर 401 ते 500 दरम्यान निर्देशांक असेल तर हवा अति खराब आणि घातक मानली जाते.

हेही वाचलं का?

[ad_2]

Source link

Leave a Reply