धनगर आरक्षण आंदोलन पेटले;गिरीश महाजनांची मध्यस्थी फेल!

उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली

चौंडी (अहिल्यानगर) : चौंडी येथे गेल्या अकरा दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी व मध्यस्थी करण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन हे आले होते. मात्र, जोपर्यंत धनगर आरक्षणावर तातडीने धनगर बांधव व संबंधित अधिकारी व मंत्री यांची बैठक होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतल्याने गिरीश महाजन यांनी केलेली मध्यस्थी अयशस्वी झाली आहे.

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीत यशवंत सेनेच्या वतीने उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर यांनी गेल्या बारा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मात्र उपोषणकर्ते उपोषणावर ठाम आहेत. काल मंत्री गिरीश महाजन यांनी चौंडी येथील उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. व धनगर बांधवांशी चर्चा केली. धनगर समाजाच्या बांधवांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलताना सांगितले की, धनगर समाज २०१४ मध्ये मोठ्या अपेक्षेने भाजपसोबत राहिला आहे. अकरा दिवसांपासून चौडी येथे आरक्षणासाठी अमरण उपोषण चालू आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दखल केले आहे तरीही सरकारने अकरा दिवसापर्यंत या उपोषणाची दखल घेतली नाही .एवढी धनगर समाजाची कुंचबना सरकारकडून झाली आहे. धनगर समाजाचे आजपर्यंत खुप नुकसान झाले आहे.

यानंतर मंत्री गिरिश महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपोषणकर्त्यांची फोनद्वारे संवाद साधुन दिला. फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी उपोषणकर्त्यांशी बोलताना सांगितले की दोन दिवसांत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर बांधव ,संबंधित अधिकारी व मंत्री यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ. यासाठी आपण सर्वजण मंबई येथे यावे, सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करुन मार्ग काढु. आम्ही तुम्हाला काहीतरी अश्वासन देऊन फसवायचे नाही तुम्हाला आरक्षण दिल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे सांगितले.

या नंतर यशवंत सेनेचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, उपोषणकर्ते सुरेश बंडगर व प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे यांनी बोलताना सांगितले की, तात्काळ लवकर बैठक आयोजित करून धनगर समाजाच्या आरक्षणावर मार्ग काढा? जोपर्यंत धनगर समाजाला तुमच्या निर्णयाबाबत विश्वासार्हता वाटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही .पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्राण गेला तरी चालेल पण उपोषणापासुन मागे हटणार नाही, असे सांगितले.

नंतर गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की शासन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे धनगर आरक्षण मिळाल्या शिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. धनगर समाजाच्या बांधवांसोबत जी बैठक लावायची आहे त्या बैठकीला उशीर होणार नाही. गणपती आगमन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशीच बैठक लावण्यात येईल. चर्चा मधुन मार्ग निघत असतो. सरकारशी बोलले पाहिजे आंदोलकांना मी सांगितले पण ते उपोषणावर ठाम आहेत पण तरी सुध्दा मी त्यांच्या तब्येतीची त्यांनी काळजी घ्यावी, आसे सांगितले.

यावेळी आ. प्रा.राम शिंदे ,आ. रत्नाकर गुट्टे , जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे (बारामती), आण्णासाहेब रूपनवर (माळशिरस), अक्षय शिंदे (चौंडी ) गोविंद नरवटे (लातुर), सुरेश बंडगर (परभणी) समाधान पाटील (जळगाव), नितीन धायगुडे (नातेपुते), किरण धालपे (इंदापुर), बाळा गायके (बिड) चौंडी चे सरपंच सुनील उबाळे, चेअरमन विलास जगदाळे, मोहन (मामा) गडदे , संतोष कुरडुले, अजित उबाळे, अजित शिंदे, अतिश शिंदे, अमोल उबाळे, गणेश उबाळे यांच्या सह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply