दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं! म्हणाले…

मुंबई –नागपुर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस चांगलाच वादळी ठरला आहे. दिवसभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्याचं दिसून आलं. विरोधकांनी एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची देखील कोंडी करण्यात आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दिशा सलियन मृत्यु बाबत सतत प्रश्न निर्माण होत आहेत म्हणुन फडणवीस यांनी हे प्रकरण एसआयटीकडे सोपवलं आहे. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा आहे.

 

काल (दि. 22) गुरुवारी भाजप नेते नितेश राणेंनी दिशा सालियन प्रकरण विधानसभेत आपलं म्हणने मांडलं होतं. “कोणाच्या राजकीय दबावामुळे दिशा सालियन प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला. तिच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं. 8 जूनच्या पार्टीत कोण कोण होतं? याची चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी नितेश राणेंनी केली होती.

दरम्यान, नितेश राणेंच्या आरोपांना आता स्वतः आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. या प्रकरणी अखेर आज त्यांनी आपले मौन सोडताना म्हंटले, “दिशा सालियनचा मृत्यू झाला, त्यादिवशी माझ्या आजोबांचं (रश्मी ठाकरेंच्या वडिलांचं) निधन झालं होतं. त्यामुळे मी रुग्णालयात होतो. पण, सत्य आहे 32 वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरलं आहे.” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Leave a Reply