हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीचे छापे

 

राष्ट्रवादीत खळबळ

कोल्हापूर/पुणे: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडी च्या कारवाया थंडावल्या असे वाटत असतानाच इडीने पहिली मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, शरद पवारांचे विश्वासू सहकारी हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ईडीच्या पथकाने आज त्यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील ठिकाणांवर छापे सकाळी 6 वाजल्यापासून मुश्रीफ यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीचे छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी ईडीकडे तक्रारही केली होती.

 

याबाबत अधिक माहिती अशी की,अप्पासाहेब नलवडे साखर कारखानातल्या १०० कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर ही कारवाई चालू आहे.किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. २०२० साली कोणत्याही पद्धतीने पारदर्शक व्यवहार न होता आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला.

जावई माझा भला…

या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही या कंपनीला कंत्राट का दिले? हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

आजच्या कारवाईनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी म्हटले की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना १५०० कोटी रुपयांचे कंत्राट त्यांच्या जावयाच्या बनावट कंपनीला दिले होते.मी याचे पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५८ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला. २०१९ मध्ये धाडी पडल्या होत्या. मंत्री असताना मुश्रीफ यांनी आणखी अफरातफर केली आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Leave a Reply