पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटी घटवली, डिझेल स्वस्त होणार?

एकीकडे पेट्रोल- डिझेलचा तुटवडा जाणवणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच केंद्र सरकारने सर्व सामान्यांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे.
२६ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने डिझेलवर उत्पादन शुल्क १३ रुपये प्रति लिटरवरून ३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये प्रति लिटरवरून शून्य केले आहे. या मोठ्या निर्णयामुळे डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील का?

इराण इस्रायल-अमेरिका युद्धांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असताना, केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्य जनता आणि अर्थव्यवस्था या दोघांसाठीही मोठा दिलासा मानला जात आहे. या निर्णयाचा थेट परिणाम इंधनाच्या किमतींवर होईल, ज्यामुळे तेल कंपन्या आणि जनतेवरील भार कमी होईल. याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, जर तेल कंपन्यांनी किमती वाढवल्या नाहीत, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतात.

भारताकडे किती दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा?

भारताने पुढील ६० दिवसांसाठी इतर स्रोतांकडून पुरेसा कच्च्या तेलाचा पुरवठा सुरक्षित केला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे की, देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा असून ते सामान्यपणे कार्यरत आहेत. पेट्रोल किंवा डिझेलचे रेशनिंग नाही. निवेदनानुसार, पेट्रोलियम कंपन्यांनी ‘कॅश-अँड-कॅरी’ पेमेंट प्रणाली लागू केल्यामुळे काही पेट्रोल पंपांना, विशेषतः लहान शहरांमधील पंपांना, इंधन पुरवठ्यात अडचणी येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत देशभरात विक्रीत १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर काही ठिकाणी ती सरासरी दैनंदिन विक्रीच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक पोहोचली आहे. ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अफवांमुळे अनेक राज्यांमध्ये घाबरून खरेदी होत असल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply