फक्त मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार- इम्तियाज जलील

मुंब्रातील एमआयएमची नगरसेविका सहर शेख यांनी ‘हिरवा मुंब्रा करणार’ असं वक्तव्य केल्यामुळे गदारोळ उडाला होता. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सहर शेख हिची भेट घेतली आणि जोरदार पाठराखण केली.

सहर शेखने असं काय बोलली होती की तिला पोलिसांनी नोटीस दिली. सहरने केलेल्या वक्तव्याला मी पाठिंबा देतो. येणाऱ्या काळात आम्ही संपुर्ण राज्यात हिरवा रंग करणार’ असं म्हणत जलील यांनी भाजपच्या नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

⁠MIM ची नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्र्यात आले होते. सहर शेख हिची भेट घेतली. जलील हे ⁠भगवी मफलर घालून पत्रकार परिषदेला आले होते. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार प्रहार केला.

“या देशाला रंगात वाटले आहे. ⁠हा रंग कोणत्या विशेष जातीचा नाही ⁠पण रंग जातीला जोडले जातात कारण त्यांची मानसिकता काय आहे हे लक्षात येते. नितेश राणे यांचा व्हिडिओ जलील यांनी पत्रकार परिषदेत प्ले केला. ⁠नितेश राणे बोलले मशिदीमध्ये घुसून मारु तेव्हा नितेश राणे यांना नोटीस दिलीये का? ⁠यांच्याकरता कायदा वेगळा आहे का? ⁠फक्त किरीट सोमय्या येतात आणि आमच्या सहर शेखला नोटीस दिली जाते. ⁠मी आलो तर मोठ्या संख्येनं लोकं पोलीस स्टेशनमध्ये येतील. ⁠सहरच्या वक्तव्यावर एवढं रान पेटवलं गेलं. ⁠कोणत्या आधारे सहर शेखला नोटीस पाठवली. ⁠भाजपचे पिल्ले जे बोलतात त्यावर काही कारवाई नाही. ⁠पोलीस काय करत आहे? असा संतप्त सवाल जलील यांनी उपस्थित केला.

सहर ने केलेल्या वक्तव्याला मी पाठिंबा देतो. येणाऱ्या काळात आम्ही संपुर्ण राज्यात हिरवा रंग करणार आहोत. किरीट सोमय्यांना मी चॅलेंज करतो. भाजपाची सत्ता आहे काही करू असं वाटत असेल तर, सोमय्या पुन्हा मुंब्र्यात आले तर त्यांचे व्हिडीओ चौकात दाखवेन’ असा इशाराच जलील यांनी सोमयांना दिला.

“⁠मुंबई आणि महाराष्ट्रासह आम्ही १२५ जागा जिंकून मोठी भरारी घेतली आहे. ⁠पक्षाबाबत बोलले जाते आम्ही जातीवादी आहे. ⁠आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे. ⁠ओवेसीपेक्षा मोठा नेता या देशात नाहीये. ⁠संविधान वाचवले पाहिजे यांवर ते वारंवार बोलत आहेत. ⁠भाजपा सत्तेत आल्यापासून हिंदू राष्ट्र करायचे बोलत आहेत,
⁠फक्त सत्तेसाठी ते हे करत आहेत, त्यांचे आम्ही निंदा करतो. ⁠भाजपा शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गटाची मी निंदा करतो, अशी टीका जलील यांनी केली.

“आमच्यावर खुप मोठी जबाबदारी आलीये पक्षाला कसं मोठं करता येईल. ⁠MIM हिरवा रंगाचे आहे असं सर्व बोलतात पण MIM चा हिंदू बांधव विजय उबाळे याला मुस्लिम भागातून निवडून आणले. ⁠सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवून आम्हाला पुढे जायचं आहे. ⁠आम्ही मागासवर्गीय समाजातील अनेकांना निवडून आणले आहे. ⁠मुंब्र्यात हिरवा-भगवा सुरू आहे पण हे कोण बघत नाही की, हिंदू मयुर सारंग याला आम्ही निवडून आणलं. ⁠१२५ मध्ये अनेक जण हिंदू आहेत जे MIM च्या तिकिटावर निवडून आलेत. पराभव झाला आहे त्यांचा त्यामुळे ते परेशान आहेत, असंही जलील यांनी ठणकावून सांगितलं.

Leave a Reply