१ एप्रिल २०२६ पासून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) कडून FASTag च्या वार्षिक पासच्या दरात मोठी वाढ करण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार, हा पास आता ३०७५ रुपये पर्यंत महाग होणार असल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
मात्र ३१ मार्चपूर्वी जुन्या दरात पास मिळवण्याची ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही हायवेवर वारंवार प्रवास करत असाल तर वाढीव खर्चाचा फटका बसण्यापूर्वीच ही तयारी करणे फायदेशीर ठरेल.
राजमार्ग यात्रा ॲप कसे वापरायचे?
ऑनलाइन पास मिळवण्यासाठी ‘राजमार्ग यात्रा’ (Rajmarg Yatra) हे अधिकृत ॲप किंवा ‘My FASTag’ ॲप सर्वात सोपे साधन आहे. सर्वप्रथम हे ॲप डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल नंबरने लॉग-इन करा. त्यानंतर ‘FASTag Services’ सेक्शनमध्ये जाऊन तुमच्या गाडीचा नंबर नोंदवा. तिथे तुम्हाला ‘Monthly/Annual Pass’ निवडण्याचा पर्याय मिळेल, जिथे तुम्ही टोल प्लाझा निवडून ऑनलाइन पेमेंट पूर्ण करू शकता. पेमेंट यशस्वी होताच तुमचा स्वस्त दरातील पास सक्रिय होईल.
वार्षिक पासचा सर्वात मोठा फायदा म्हणजे टोल नाक्यांवर वारंवार सुट्या पैशांसाठी लागणारी रांग आणि वेळेचा अपव्यय टाळता येतो. ठराविक टोल नाक्यांवरून नियमित ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पास अत्यंत किफायतशीर ठरतो. १ एप्रिलनंतर याच सुविधेसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील, त्यामुळे आताच ही प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही वर्षाचे हजारो रुपये वाचवू शकता.
पास रिन्यू करण्यापूर्वी तुमचे FASTag KYC अपडेटेड असल्याची खात्री करून घ्या. जर तुमचे KYC अपूर्ण असेल, तर तुमचा FASTag Blacklisted टाकला जाऊ शकतो आणि तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागू शकतो. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेच्या पोर्टलवर किंवा ‘My FASTag’ ॲपवर जाऊन स्टेटस तपासा आणि आपला प्रवास अडथळा मुक्त आणि स्वस्त बनवा